19 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

सरकारने चार चार दाखले जरी दिले, आमचं राजकीय आरक्षण जाईल- आ. गोपीचंद पडळकर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

इंदापूर |

राज्यातील विविध भागांत ओबीसी बचाव महाएल्गार सभेचे आयोजन छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे. ज्यामुळे भुजबळ वि. जरांगे पाटील असा नवा वाद देखील राज्यात सुरू झाला आहे. ओबीसी एल्गारचा आजचा मेळावा हा पुण्यातील इंदापूर येथे होत आहे. या सभेत ओबीसी आरक्षणासाठी गोपीचंद पडळकर यांनी दिली ओबीसी बांधवांना शपथ दिली आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले की, राजकीय नेते हिणवत आहे की, गावात नाभिक समाजाची घरं किती? गुरव समाजाची घरं किती? लोहाराची, सोनाराची, सुताराची घरं किती? पण सरकारने गावात ओबीसी किंवा कुणबीचा एक दाखला दिला तर आमचं सरपंचाचा आरक्षण जाईल, ओबीसीचं पंचायत समितीचं आरक्षण जाईल आणि राजकर्त्यांना हेच करायचं आहे. आमदार आणि खासदार असलेल्या मंत्र्यांच्या जागा पूर्ण झाल्यामुळे आता त्यांना ओबीसीच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या जागेवर मेंबर व्हायचं आहे, नगरसेवक, पंचायत समिती, ग्रामपंचायतचा सदस्य, गावचा सरपंच आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हायचं आहे. नगरपालिकेचा नगराध्यक्ष आणि महानगरपालिकेचा महापौर व्हायचं आहे, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.

 

राज्य सरकारने चार चार दाखले जरी दिले, आमचं राजकीय आरक्षण जाईल. यासाठी आपल्याला जर पुढचं सगळं वाचवायचं असेल तर महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसींना एकत्रित येण्याची गरज आहे, एकजूट होण्याची गरज आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावं एवढीच मी विनंती तुम्हाला करतो. अकरा तारखेला विधान भवन नागपूरला धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून मोर्चा ठेवला आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला माझं आवाहन आहे की, लाखोंच्या संख्येने त्याठिकाणी या, घरात बसू नका, असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी समाजाला केले.

गावगाड्यातील सगळा ओबीसी आता एकजूट झाला आहे. अजूनही प्रेत जाळायला आम्हाला स्मशानभूमी नाही. स्मशानभूमीत गेले की इथे जाळू नका. तुमची स्मशानभूमी तिकडे आहे, असे म्हटले जाते. ही स्मशानभूमी कुठे तर ओढ्यात तुम्ही प्रेत जाळा, असे सांगण्यात येत असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले.

ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कुणबी दाखले देण्याचे काम सुरू आहे. धनगर, माळी, साळी, मुस्लिमांसह ओबीसी समाजातील इतर जातींच्या मुलांना अजूनही दाखले मिळत नाहीत. दाखल्यांसाठी तीन-तीन चार-चार महिने फिरावे लागते. आमच्या नावावर जमीन नाही, सातबारा नाही आणि कुठले कागदपत्र नाही. तुम्ही इकडे एका बाजूला दिवसात दाखले देताहेत. अर्ज करूनही चार-चार महिने आमच्या लोकांना दाखले मिळत नाही. त्यांच्याकडे तुम्ही वेगवेगळे पुरावे मागताहेत. हा दुजाभाव कशासाठी आणि कोण करतंय?, असा सवाल गोपीचंद पडळकरांनी केला.

 

गोपीचंद पडळकरांसह ओबीसी बांधवांनी घेतली शपथ

 

इंदापूरच्या महाएल्गार सभेत गोपीचंद पडळकर यांच्यासह त्याठिकाणी सभेला उपस्थित ओबीसी बांधवांनी शपथ घेतली. गोपीचंद पडळकर म्हणाले की, ओबीसी भटके विमुक्त आदिवासी दलित लोक संविधान साक्षी ठेऊन शपथ घेतो की, उपेक्षितांच्या न्याय हक्कासाठी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करू, महाराष्ट्राला समता, समानता, बंधुतेच्या वाटेवर पुढे नेऊ, ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी त्यांचे हक्क व अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी नेहमी एकत्रित राहू, जय भीम, जय मल्हार, जय ज्योती, जय ओबीसी, अशी शपथ गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी समाजला दिली.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles