बीड |
अंजुमन इशात ए तालीम या संस्थेच्या मिलिया शाळेतील शिक्षकाने शाळेतील काही महिला शिक्षिकासोबत शाळेच्या वर्गखोली मध्ये अनैतिक संबंधचे व्हींडीओ काढले असल्याचे प्रकरण माध्यमांनी उघडकीस आणले होते. अखेर मिलिया शाळेच्या मुख्याध्यापक यांच्या फिर्यादीवरून सदर शिक्षक आमेर काझीवर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड येथील मिलिया शाळेतील शिक्षक आमेर काझी याने आपल्या शाळेतील काही शिक्षिका यांच्यासोबत अश्लील चाळे केल्याचे प्रकरण माध्यमांनी उघडकीस आणले होते. आमेर याने 2012 ते 2023 या काळात शाळेतील शिक्षिका व इतर महिला सोबत शारीरिक संबंध ठेवले. हे करताना त्याने याचे व्हिडीओ तयार केले. हे व्हिडीओ त्याने काही पॉर्न साईटला विकल्याचे माध्यमांनी ठामपणे म्हटले होते.या प्रकरणात सुरवातीला आमचा काही संबंध नाही,आमच्या शाळेचा, संस्थेचा यात सहभाग नाही असा दावा संस्थाचालकांनी केला होता. मात्र माध्यमांनी या प्रकरणात सातत्याने प्रकाश टाकून या शाळेतील हे सेक्स रॅकेट उघडकीस आणले होते, तरीदेखील शाळेचे व्यवस्थापन यावर गंभीर नव्हते.समाजाने या प्रकरणात संस्थेला जाब विचारला.शेकडो विद्यार्थ्यांनी आपले दाखले काढून दुसर्या शाळेत ऍडमिशन घेतले.
आमेरच्या या प्रकारात संस्था आणि काही शिक्षक,शिक्षिका दोषी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संस्थेने आमेर यांच्यासह तीन शिक्षकांना निलंबित केले तर दोघी जणींना सेवानिर्वुत्ती घेण्यास भाग पाडले.म्हणजेच माध्यमांनी वेळोवेळी जो दावा केला होता तो सत्य होता हे सिद्ध झाले आहे.
आमेरने हे व्हिडीओ पॉर्न साईट ला विकल्याचे देखील उघड झाले आहे.त्यामुळे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत मुख्याध्यापक सय्यद अब्दुल सत्तार यांच्या फिर्यादीवरून बीड शहर पोलिसात कलम 292 (2),कलम 294,कलम 500,66,67,66 ब,67 क नुसार आमेर व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.