19 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

आळंदी येथे 24 डिसेंबर रोजी होणाऱ्या सुतार समाज महामेळाव्यास समाज बांधवांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे-भगवानराव राऊत

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

आळंदी येथे 24 डिसेंबर रोजी होणाऱ्या सुतार समाज महामेळाव्यास मराठवाडयातील सुतार समाज बांधवांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन विभागीय मार्गदर्शक राज्य समन्वयक उद्योजक भगवानराव राऊत यांनी केले आहे.

 

२४ डिसेंबर २००२३ रोजी आळंदी येथे होऊ घातलेल्या सुतार समाज महामेळाव्यासाठी जास्तीत जास्त सुतार समाज बांधवांनी सहभागी यासाठी छत्रपती संभाजीनगर मधील सातारा देवळाई परिसर बीड बायपास मंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय मार्गदर्शक राज्य समन्वयक उद्योजक भगवानराव राऊत साहेब, माजी जिल्हाधिकारी के. व्ही . गवळीसाहेब व तसेच संजयदादा बोराडे उपस्थित होते.

 

यावेळी बैठकीत संपूर्ण मराठवाड्यामध्ये प्रत्येक समाज बांधवांपर्यंत सुतार समाज महामेळाव्याचा निरोप निमंत्रण पोहोचविण्यासाठी सर्वांनी मनापासून प्रयत्न करण्याचा निर्धार केला व तसेच मेळावा यशस्वी करण्यासाठी २४ डिसेंबर पर्यंत सर्व समाज बांधव कार्यरत राहतील अशी ग्वाही सर्वांनी दिली. व तसेच संभाजीनगर मधील प्रत्येक मंडळामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये मेळावा तयारी बैठका आयोजित करण्याचे ठरले.

 

विश्वकर्मा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व सचिव शत्रुघ्न सुरासे यांनी बैठकीचे उत्कृष्ट नियोजन केले. याप्रसंगी परिसरातील समाजबांधवही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles