13.9 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

महामार्ग पोलीसांच्या नाकावर टिच्चून पंकज कुमावत यांच्या पथकाची कारवाई महालक्ष्मी चौकामध्ये गुटख्यासह एक कोटींचा मुद्देमाल केला जप्त

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड । प्रतिनिधी

धुळे-सोलापूर महामार्गावरील महालक्ष्मी चौकात सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने महामार्ग पोलीसांच्या नाकावर टिच्चून कारवाई करत अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारे कंटेनर पकडले. यावेळी गुटख्यासह एक कोटी 80 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने गुटखा माफियामध्ये खळबळ माजली आहे. महामार्ग पोलीसांच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून कोट्यवधी रुपयांचा गुटखा घेवून महामार्गावरुन कंटेनर, ट्रक सर्रास धावतात. मात्र महामार्ग पोलीसांना दिसत नाहीत हे आश्‍चर्य म्हणावे लागेल. महामार्गावर उभे असलेले महामार्ग पोलीस नेमकं काय तपासतात किंवा त्यांच्याच आशीर्वादाने हा प्रकार सुरु असल्याचे बोलले जात आहे.

सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना माहिती मिळाली की, चौसाळ्याकडून गेवराईकडे एक कंटेनर क्रमांक (टीएस-07 यूएन-1894) गुटखा घेवून जात आहे. कुमावत यांच्या पथकाने धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बायपासवरील महालक्ष्मी चौकात सापळा लावला. सदरील कंटेनर थांबवला असता त्यामध्ये गुटखा आढळून आला. कार्यारंभ यावेळी 1 कोटी 80 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चालक नाझीम इमामी खान यासह तिघांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील बाबासाहेब डापकर, दिलीप गीते, भरत शेळके, गोविंद मुंडे, महादेव बहिरवाळ, शमीम पाशा यांनी केली.

महामार्गावरुन गुटख्याची तस्करी जोमात?
दरम्यान कोटी-कोटी रुपयांचा गुटखा घेवून महामार्गावरुन कंटेनर, ट्रक सर्रास धावतात. मात्र महामार्ग पोलीसांना दिसत नाहीत हे आश्‍चर्य म्हणावे लागेल. महामार्गावर उभे असलेले महामार्ग पोलीस नेमकं काय तपासतात किंवा त्यांच्याच आशीर्वादाने हा प्रकार सुरु असल्याचे आता बोलले जात असून महामार्ग पोलीसांच्या आशीर्वादानेच गुटख्याची तस्करी जोमात सुरु आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles