-8.6 C
New York
Wednesday, January 28, 2026

Buy now

spot_img

जमिन संपादनाची लाभार्थी शेतकऱ्याच्या संचीकेला भूसंपादन कार्यालयातून फुटले पाय

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील जायकवाडी प्रकल्प भूसंपादन कार्यालयातून एका शेतकऱ्याची जमिन संपादनाची संचिकाच गायब झाली असुन , गेल्या महिनाभरापासून शोध घेऊनही सापडत नसल्याची लेखी तक्रार संबधित शेतकऱ्यांने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेनाद्वारे केली आहे.

दरम्यान भूसंपादन कार्यालयातूनच सांचिकेला पाय फुटले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

याबाबत जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे बीड तालुकयातील तिप्पटवाडी येथील शेतकरी जनार्दन गणपतराव ढेकळे यांची जमिन तिप्पटवाडी पाझर तलावासाठी संपादित करण्यात आली आहे. याचा मावेजा मिळण्यासाठी जनार्दन ढेकळे यांनी भूसंपादन कार्यालयाकडे दि. ४/३/२००६ ला मागणी अर्ज र्केली होता. याबाबत संबधित शेतकऱ्यांने अनेकदा मावेजा मिळण्याची मागणी केली आहे. याच तलावातील जमिन संपादन झालेल्या इतर शेतकऱ्यांना मावेजा वाटप करण्यात आलेला आहे. मात्र ढेकळे यांना मावेजा आजपर्यत देण्यात आलेला नाही.

 

दरम्यान भूसंपादन कार्यालयातून या मागणीची संचिका क्र. १५/१९९५ पाझर तलाव तिप्पटवाडी आता भूसंपादन कार्यालयात सापडत नसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उडवाउडवीचे उत्तरे देत असल्यामुळे शेतकरी जनार्दन ढेकळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देऊन संचिका सापडण्याची मागणी केली आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles