19 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

सहाय्यक अभियंत्याला एक कोटीची लाच घेताना रंगेहात पकडले

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर येथील महाराष्ट्र औद्योगिक प्रदेश औद्योगिक विकास महामंडळाच्या सहाय्यक अभियंता यास तब्बल एक कोटींची लाच घेताना नाशिक येथील प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि.3) सायंकाळी रंगेहात पकडले.

अमित गायकवाड (वय 32 वर्ष , रा. नागापूर ) असे या सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी नागापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला.

 

अहमदनगर येथील औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत ठेकेदाराने १०० एम एम व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे काम केले होते. या कामाचे २ कोटी ९९ लाख रुपये बिल होते. या बिलाची ठेकेदाराने मागणी केली. तेव्हा मागील तारखेचे बिल आउटवर्ड करून त्यावर तत्कालीन उपअभियंता गणेश वाघ यांची स्वाक्षरी घेण्यासाठी गायकवाड यांनी ठेकेदाराकडे तब्बल एक कोटींच्या लाचेची मागणी केली. दरम्यान ठेकेदाराने नाशिक येथील प्रतिबंधक विभागाला कळविले. ही रक्कम शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास नगर- छत्रपती संभाजी नगर रोडवरील शेंडी बायपास येथे स्वीकारण्याचे ठरले. त्यानुसार गायकवाड हा रोडच्या बाजूला असलेल्या आनंद सुपर मार्केटच्या मोकळ्या जागेत आला. त्याला लाच स्वीकारताना नाशिक येथील पथकाने रंगेहात पकडले. त्याला ताब्यात घेऊन शासकीय विश्रामगृहात आणण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता.या प्रकरणी नागापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नाशिक येथील प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालवलकर यांच्या पथकाने केली.

 

तत्कालीन उप अभियंता वाघ याचा ५० टक्के वाटा

गायकवाड यांनी घटनास्थळावरून तत्कालीन उपअभियंता गणेश भाग यास फोन केला पैसे मिळाले आहेत तुमचे यशाची ५० टक्के रक्कम कुठे पोहोच करू, अशी विचारणाही त्याने केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles