13.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

पाटोदा तालुक्यातील कोतन गावात गुप्तधनासाठी मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
  •  अंमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 
पाटोदा |

पाटोदा तालुक्यातील कोतन गावात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने गुप्तधन आणि जमिनीतील पुरून ठेवलेले सोने बाहेर काढण्यासाठी मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने खळबळ उडाली असून, गावकरी दसऱ्याच्या दिवशी सहा तासांपासून अमळनेर ठाण्यात बसून होते. मात्र, फिर्याद घ्यायला सक्षम अधिकारी नसल्याने गावकरी संतप्त झाले.

यासंदर्भात अमळनेर पोलिस ठाण्यात संपर्क संपर्क केला असता, त्यांनी या प्रकरणात ग्रामस्थांचा अर्ज पोलिसांनी स्वीकारला असून, हे प्रकरण अंधश्रद्धा कायद्याशी संबंधित आहे. त्यामुळे सर्व पडताळणी करून तातडीने पुढील कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
 पाटोदा तालुक्यातील कोतन या गावातील दादाराव रघुनाथ घोशिर या व्यक्तीने गावात अंधश्रद्धा पसरवली आहे. गावातील भाऊसाहेब गरवकर यांच्या घरी जाऊन त्यांना आमिष दाखवत त्यांची मुलगी पूजा हिला बळी देण्यासाठी घेऊन जाणार असल्याचे सांगितले. पुण्यातील एका जागेवर गुप्तधन आहे, ते बाहेर काढण्यासाठी कुमारिकेचा बळी द्यायचा असल्याने घोशिर यांनी गरवकर यांच्या मुलीची  मागणी केली. हा सगळा प्रकार गरवकर यांनी धावून ग्रामस्थांना सांगितला. सगळ्यांनी मिळून घोशिर यांना जाब विचारला तेव्हा मी बळी देणार आहे.  तुम्हाला काय करायचे ते करा, अशी धमकी  देण्यात आली.
या सगळ्या प्रकारानंतर ग्रामस्थांनी मंगळवारी दि. २४ ऑक्टोबर रोजी थेट अमळनेर पोलिस ठाणे  गाठले. मात्र, या ठिकाणचे सगळे अधिकारी बंदोबस्तावर असल्याने ग्रामस्थांनी अर्ज दिला. सायंकाळी एपीआय चंद्रकांत गोसावी यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी या प्रकरणात सत्यता पडताळून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार तातडीने कारवाई केली जाईल, होते. असे स्पष्ट केले आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles