बीड शहरात किरकोळ वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली. किरकोळ कारणावरून शाब्दीक वाद होत वाद विकोप्याला जात एकाने थेट गोळीबार केला. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्या छातीत गोळी घुसली आहे. जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीची प्रकृती चिंताजनक आहे.
ही घटना बीड शहरातील शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पात्रुड गल्ली माळी वेस येथे काल रात्री साडे आकरा वाजेदरम्यान घडली. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून बीड पोलिसांचे दोन पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आले असल्याचे संबंधित पोलिसांनी सांगितले.
बीड येथील पाथरूड गल्ली, माळी वेस येथील रहिवासा मनोज दत्ताराव जाधव असे गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. 1 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री साडेअकरा वाजेच्यासुमारास मनोज याचा त्याच्या मामाच्या मुलगाशी वाद झाला. या वादाचे रूपांतर थेट गोळीबारात होत आरोपीने थेट मनोजवर गोळी झाडली. ही गोळी मनोज जाधवच्या छातीत घुसली. मनोज रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसतात आरोपीने तेथून पळ काढला. त्यानंतर जखमीला तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजी नगरला हलवण्यात आले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस उपाधीक्षक संतोष वाळके, बीड शहर पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख कुलकर्णी यांच्यासह बीड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीच्या शोधासाठी रात्रीच पोलिसांची दोन पदके पाठवण्यात आले असल्याचे संबंधित पोलिसांनी सांगितले आहे. अद्याप आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेने मात्र बीड शहरात मोठी खळबळ उडाली. गोळीबारानंतर उडलेली कॅप पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास बीड पोलिस करत आहेत.
दोन महिन्यात दुसऱ्यांदा गोळीबार
बीड जिल्ह्यात महिनाभरात गोळीबाराची दुसरी घटना आहे. यापुर्वी जिल्ह्यातील परळी तालुक्यातील कन्हेरवाडी परिसरात अशीच एक खळबळजनक घटना घडली होती. परिसरातील हॉटेल यशराजमध्ये हॉटेल मॅनेजरने सिगारेट पाकीटाचे पैसे मागितल्याचा राग आल्यावरुन 4 अज्ञातांनी 9 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 10:45 वाजेच्या सुमारास गोळीबार केला होता. यावेळी हॉटेलात चांगलाच राडा रंगला होता. हॉटेल यशराजमध्ये काल रात्री 4 अज्ञात ग्राहक आले होते. यांनी याठिकाणी काही वेळ घालवल्यानंतर जातांना हॉटेलच्या मनेजरसोबत सिगारेटच्या कारणावरून वाद घालत हॉटेलातील साहित्यांची तोडफोड करत आरोपिंनी हवेत बंदुकीच्या 3 गोळ्या झाडात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळाने चौघे अज्ञातांनी तिथून पळ काढला होता.