18.2 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

मुलांचा रोज दिवसातला ४७ टक्के वेळ मोबाईलपुढे जातोय वाया

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

नव्याने करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात असं आढळून आलं आहे की, १२ वर्षांपर्यंतची कमीत कमी ४२ टक्के मुलं दिवसातून दोन ते चार तास आपल्या मोबाईलला चिकटलेली असतात. तर याहून जास्त वयाची मुलं दररोज आपला ४७ टक्के वेळ मोबाईल पाहण्यातच घालवतात.

वायफायचा होणारा वापर तपासणारं डिव्हाईस बनवणाऱ्या हॅप्पीनेट्ज या कंपनीने हे सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणानुसार, ज्या घरांमध्ये अनेक उपकरणं असतात, तिथे मुलांना स्क्रिनपासून दूर करणं आणि त्यांना आक्षेपार्ह माहितीपासून लांब ठेवणं आव्हानात्मक असतं. या सर्वेक्षणामध्ये १५०० जणा्ंनी सहभाग घेतला होता. यामध्ये असं आढळून आलं की १२ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ६९ टक्के मुलांजवळ स्वतःचा मोबाईल किंवा टॅबलेट आहे, ज्याच्या माध्यमातून ते कोणत्याही अडथळ्याशिवाय काहीही बघू शकतात.

या सर्वेक्षणात असंही आढळून आलं आहे की ७४ टक्के मुलं युट्यूब पाहतात. तर १२ वर्षे आणि त्याहून अधिक वयाची ६१ टक्के मुलं गेमिंगकडे आकर्षित होतात. यातून होणाऱ्या मनोरंजनामुळे या मुलांचा स्क्रिनटाईम वाढत आहे. त्यामुळे १२ वर्षे वयापर्यंतची ४२ टक्के मुलं दररोज २ ते ४ तास स्क्रिनवर असतात. तर त्याहून अधिक वयाची मुलं दिवसातला ४७ टक्के वेळ स्क्रिनसमोर बसून असतात.

हॅप्पीनेट्ज कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक ऋचा सिंह म्हणाल्या की जेव्हा शिक्षणापासून ते मनोरंजनापर्यंत सर्व काही डिजिटल होत आहे, त्या काळामध्ये स्मार्ट डिव्हाईसेस लहान मुलांना मदत करत आहेत. मुलं आपला बहुतांश वेळ या डिव्हाईसेससोबतच घालवतात. मग ते अभ्यास करणं असो, होमवर्क करणं असो किंवा घरच्यांबरोबर मित्रमैत्रिणींबरोबर चॅट करणं असो.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles