-0.5 C
New York
Sunday, January 12, 2025

Buy now

spot_img

कसबा मतदारसंघात मविआकडून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी विजय मिळवला

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पुणे |

२८ वर्षं भाजपाच्या हाती असलेल्या कसबा मतदारसंघात मविआकडून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी विजय मिळवला आहे. धंगेकर यांनी ११ हजार ४० मतांनी विजय मिळवला आहे. तर भाजप उमेदवार हेमंत रासने यांना ६२२४४ मतं मिळाली आहे.

अंतिम फेरी अखेरीस रवींद्र धंगेकर आघाडीवर

कसबा पेठ अंतिम फेरी अखेरीस रवींद्र धंगेकर ७३१९४ मतं मिळवत११ हजार ४०मतांनी आघाडीवर आहेत. तर हेमंत रासने ६२२४४ मते मिळाली आहेत.

पंधराव्या फेरी अखेरीस रवींद्र धंगेकर आघाडीवर

कसबा पेठ पंधराव्या फेरी अखेरीस रवींद्र धंगेकर २३०८० मतं मिळवत ६००७ मतांनी आघाडीवर आहेत. तर हेमंत रासने ५०४९० आणि आनंद दवे १०० मते मिळाली आहेत.

तेरावी फेरी अखेरीस रवींद्र धंगेकर ५०८६ मतांनी आघाडीवर

कसबा पेठ तेरावी फेरी अखेरीस रवींद्र धंगेकर ४९९१२० मतं मिळाली आहेत. यासह धंगेकर ५०८६ मतांनी आघाडीवर आहेत. तर हेमंत रासने ४४०३४ आणि आनंद दवे १२१ मते मिळाली आहेत.

कसबा पेठ बारावी फेरी अखेरीस रवींद्र धंगेकर ४५६३८ मतं मिळाली आहेत. यासह धंगेकर ५००० मतांनी आघाडीवर आहेत. तर हेमंत रासने ४०७६१ आणि आनंद दवे १२१ मते मिळाली आहेत.

दरम्यान, कसब्यात भाजपाचा विजय शिवसेनेमुळेच होत होता, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. कसब्यात भाजपाचा विजय हा नेहमी शिवसेनेच्या पाठिंब्यानंच होत आला. आज शिवसेना मविआची घटक आहे. आम्ही सगळे एकत्र आहोत. त्याचा परिणाम तिथे दिसतोय. चिंचवडमध्ये तर भाजपाला शेवटपर्यंत घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. तिथे तिरंगी लढत आहे. आम्ही अपेक्षा ठेवून आहोत, संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles