24.1 C
New York
Saturday, July 19, 2025

Buy now

spot_img

माझ्यासोबत लग्न कर, नाहीतर पळून चल म्हणत मुलीची छेड

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

एका तरुणांकडून मुलीला सातत्याने त्रास दिला जात होता. दरम्यान माझ्यासोबत लग्न कर, नाहीतर पळून चल, अशा धमक्या देत तरुणाने अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड केल्याची संतापजनक घटना  आष्टी तालुक्यात घडली. या प्रकरणी संबंधित आरोपी तरुणावर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

रस्त्यात गाठून मुलींची छेड काढण्याचे प्रकार अजूनही थांबलेले नाही. असाच प्रकार बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एका गावात घडला. एकतर्फी प्रेमातून अनेक दिवसांपासून तरुण मुलीचा पाठलाग करत होता. याच दरम्यान मुलगी एकटी असल्याची संधी साधून आष्टी तालुक्यातील एका गावात 23 वर्षीय आरोपी तरुणाने पाठलाग करत लग्न कर नाहीतर माझ्यासोबत पळून चाल असे म्हणत मुलीला धमकी दिली.

 

दुपारच्या दरम्यान अल्पवयीन पीडित मुलीचा पाठलाग करत धमक्या देत शिवीगाळ केली होती. हा प्रकार मुलीने आई वडिलांना सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी आष्टी पोलिसात तक्रार दिली असून याप्रकरणी आरोपी तरुणावर बाललैंगिक अत्याचार कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles