13.9 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आराेपीला २० वर्षांचा सश्रम कारावास

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आराेपीला २० वर्षांचा सश्रम कारावास व एक हजाराच्या दंडाची शिक्षा लातूर येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश बी.सी. कांबळे यांनी बुधवारी सुनावली.

 

पीडित मुलीच्या लातुरातील राहत्या घरी नातेवाईक आरोपी सागर बाबासाहेब ऊर्फ धनंजय सूर्यवंशी आणि पत्नी हे नोकरीनिमित्त राहण्यासाठी आले हाेते. दरम्यान, २०१९ मध्ये पीडित मुलगी इयत्ता नववीत शिकत होती. पीडितेला शाळेत सोडण्यासाठी आणि शाळेतून घरी नेण्यासाठी आरोपी हा दुचाकीवरून जात हाेता. आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देत त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. याबाबत घरी अथवा इतर काेणाला सांगितल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. आराेपीने पीडित मुलीसाेबत सतत शारीरिक संबंध ठेवले. अखेर याबाबत मुलीने आई-वडिलांना घडला प्रकार सांगितला होता.

 

याबाबत एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, डीवायएसपी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, पोउपनि. गणेश कदम, विशाल कोडे, सुजाता कसपटे यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास करून, न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. लातूर येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश बी.सी. कांबळे यांनी आराेपीला शिक्षा सुनावली. खटल्यात पीडित मुलीचा जबाब, साक्षीदारांची साक्ष याआधारे आरोपीला दाेषी ठरवले.

 

या प्रकरणात विशेष शासकीय अभियोक्ता मंगेश महेंद्रकर यांनी सरकार पक्षाच्या वतीने बाजू मांडली. त्यांना जिल्हा सरकारी वकील संतोष देशपांडे यांनी सहकार्य केले. तपास अधिकारी पोउपनि. गणेश कदम, पैरवी ज्योतीराम माने, महिला पोलिस अंमलदार कलमुकले यांनी केली. या खटल्यात पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी प्रकरणावर लक्ष ठेवून मार्गदर्शन केले.

 

११ साक्षीदारांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली… –

यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकूण ११ साक्षीदारांची साक्ष नोंदवली असून, सरकार पक्षाची साक्ष ग्राह्य धरून लातूर येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने आरोपी सागर बाबासाहेब ऊर्फ धनंजय सूर्यवंशी (३२, रा. निलंगा, जि. लातूर) याला दोषी ठरवत कलम ३७६,(२), ३५४, ५०६ भादंवि आणि बाललैंगिक अत्याचार अधिनियम कलम ६, ८, १२ प्रमाणे २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा व एक हजाराच्या दंडाची शिक्षा ठोठावली.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles