13.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

अश्लील व्हिडिओ खासगीत पाहणे गुन्हा नाही. पण दुसऱ्याला दाखवणे गुन्हा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अश्लील व्हिडिओ पाहणे गुन्हा आहे की नाही? याबाबत केरळ उच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. केरळ उच्च न्यायालयाने एका प्रकरणावर सुनावणी करताना अश्लील व्हिडिओ खासगीत पाहणे गुन्हा नाही. पण व्हिडिओ दुसऱ्याला दाखवणे गुन्हा असल्याचे स्पष्ट केले आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, केरळ हायकोर्टाच्या न्यायाधीश पीव्ही कुन्हीकृष्णन यांच्या घटनापीठाने याबाबत निर्णय दिला आहे. कोर्टाने म्हटलं आहे की, ‘एखादा व्यक्ती खासगीत अश्लील फोटो किंवा अश्लील व्हिडिओ पाहत असेल तर गुन्हा नाही.

 

भारतीय दंड संहिता कलम 292 अंतर्गत हा गुन्हा ठरणार नाही. पण एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीस अश्लील फोटो किंवा अश्लील व्हिडिओ दाखवत असेल. तसेच सार्वजनिकरित्या दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर भारतीय दंड संहिता कलम २९२ अंतर्गत हा गुन्हा ठरतो.

 

न्यायाधीश पीव्ही कुन्हीकृष्णन यांचं म्हणणं आहे की, ‘अश्लील व्हिडिओची डिजीटल युगामुळे उपलब्धता वाढली आहे. अश्लील व्हिडिओ हे लहान मुले आणि प्रौढ्य व्यक्तींना काही क्लिकवर उपलब्ध होत आहे’.

 

एखादा व्यक्ती खासगीत कोणाला न दाखवता अश्लील व्हिडिओ पाहत असेल तर गुन्हा ठरू शकतो का? यावर भाष्य करताना न्यायाधीश म्हणाले, कोर्ट त्याला गुन्हा म्हणणार नाही. कारण एखाद्या व्यक्तीची अश्लील व्हिडिओ पाहण्याची आवड असू शकते. त्यामुळे कोर्ट त्याच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावणार नाही. २०१५ साली सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या एका निर्णयानुसार, खासगीत अश्लील व्हिडिओ पाहणे गुन्हा नाही. सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार, व्यक्तीने खासगीत अश्लील व्हिडिओ पाहणे हे त्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकारात येतं’.

 

कायदा काय आहे?

केरळ उच्च न्यायालय आणि त्याआधी सुप्रीम कोर्टानुसार, दोन्ही कोर्टाने सांगितलं की, खासगीत अश्लील व्हिडिओ पाहणे गुन्हा नाही. पण दोन्ही कोर्टाच्या निर्णयातील महत्वाच्या बाबींकडे देखील लक्ष द्यायला हवं.

 

केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, ‘एखाद्या व्यक्तीने खासगीत अश्लील व्हिडिओ पाहणे गुन्हा नाही. परंतु लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ किंवा महिलांच्या अत्याचाराचे व्हिडिओ या सारख्या व्हिडिओचा संग्रह करणे गुन्हा आहे.

 

आपल्या देशात खासगीत अश्लील व्हिडिओ पाहणे गुन्हा नाही. परंतु अश्लील व्हिडिओ, फोटो डाऊनलोड किंवा व्हायरल करणे गुन्हा आहे. असा प्रकार केल्यास माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत ६७,६७ ए, ६७बी कलमानुसार तुरुंगवास किंवा दंडात्मक कारवाई होऊ शकते.

 

६७ कलमानुसार अश्लील व्हिडिओ पाहणे, डाऊनलोड आणि व्हायरल केल्यास पहिल्यांदा तीन वर्ष तुरुंगवास आणि पाच लाख रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. दुसऱ्यांदाही त्याच प्रकारचं कृत्य करताना व्यक्ती सापडला तर ५ वर्षांचा तुरुंगवास आणि १० लाख रुपये दंड भरावा लागू शकतो.

 

६७ ए कलमानुसार, मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओचा संग्रह किंवा व्हायरल केल्यास पहिल्यांदा पाच वर्षांचा तुरुंगवास आणि १० लाखांचा दंड भरावा लागू शकतो.

 

तसेच ६७ बी कलमानुसार, मोबाईलमध्ये लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ किंवा फोटो आढळल्यास पाच वर्षांचा तुरुंगवास आणि १० लाखांचा दंड होऊ शकतो. दुसऱ्यांदा आढळून आल्यास ७ वर्षांचा तुरुंगवास आणि १० लाखांचा दंड होऊ शकतो.

 

भारतीय दंड संहितेत अश्लील व्हिडिओ प्रकरणी शिक्षेची तरतूद आहे. या प्रकरणात कलम २९२ आणि २९३ अंतर्गत शिक्षा होते.

 

 

कलम २९२ अंतर्गत, अश्लील व्हिडिओ विकणे, दुसऱ्यांना पाठवणे , पसरवणे याला गुन्हा मानला जातो. असा गुन्हा केल्यास पहिल्यांदा २ वर्षांची शिक्षा आहे. तर २ हजारांचा दंड आहे. तर दुसऱ्यांदा आढळून आल्यास ५ वर्ष शिक्षा आणि ५ हजार रुपायांची दंडात्मक कारवाई होऊ शकते.

 

याचबरोबर कलम २९३ अंतर्गत २० वर्षां खालील व्यक्तीला अश्लील बाबी दाखवणे, विकणे, भाडेतत्वावर देणे गुन्हा आहे. तर या प्रकरणात पहिल्यांदा दोषी आढळल्यास ३ वर्षांची शिक्षा आणि २ हजार रुपयांची दंडात्मक तरतूद आहे. दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास ७ वर्षांची शिक्षा आणि ५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई होऊ शकते.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles