16.8 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

लग्नाळू तरूणाला एक एकर जमिनीसह साडे नऊ लाख रूपयांना नर्सने घातला गंडा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

जामखेड शहरात एका खाजगी दवाखान्यात काम करणाऱ्या नर्सने आष्टीतील एका लग्नाळू तरूणाला एक एकर जमिनीसह साडे नऊ लाख रूपयांना गंडा घातला आहे. पहिले दोन विवाह असताना तिसरा केला. त्यानंतरही चौथ्यासोबत प्रेमसंबंध केल्यानंतर तरूणाने पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील बिभीषण पडोळे याचे आष्टी शहरात मेडिकल आहे. त्याचा दिनेश (नाव बदलले) नातेवाईक अविवाहित आहे. जामखेड शहरात एका खाजगी दवाखान्यात नर्स म्हणून काम करणारी मुलगी आहे. कामधंदा करतेय तिच्याशी तुझे लग्न लावुन देऊ, असे म्हणत दिनेशला मांडवा येथील भगवान धुमाळ, ईश्वर मुटकुळे यांनी गळ घातली. पण त्या अगोदर मुलीच्या म्हणण्यानुसार शेती नावावर करून, पाच लाख रूपये व दागिने द्यावे लागतील अशी बोलणी झाली. ३१ जानेवारी २०२३ अशी लग्नाचा मुहूर्तही ठरला. त्या आगोदर २७ जानेवारीला दिनेशने एक एकर शेती बिभीषण नावे केली. तसेच शारदा आर्सूळ (नर्स) हिच्या बँक खात्यात पाच लाख रूपये आरटीएजीस केले. त्यानंतरच ठरल्याप्रमाणे कपिधार येथे लग्न झाले.

लग्नानंतर काही दिवसांनी दिनेश कामानिमित्त बाहेर जात असे. त्यानंतर बिभीषण घरी यायचा. शारदा आणि बिभीषण यांना दिनेशने एका खोलीत रंगेहाथ पकडले. त्यामुळे त्यांच्या प्रेमप्रकरणाचा भांडाफोड झाला. पण जमिन, पैसे परत देतो म्हणल्याने दिनेश शांत राहिला. त्यानंतर काहीच प्रतिसाद न मिळाल्याने दिनेशने सोमवारी आष्टी पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली. त्यावरून शारदा विठ्ठल आरसुळ (रा.नाशिक), बिभीषण आण्णासाहेब पडोळे (रा.केळसांगवी), भगवान दत्तुबा धुमाळ, ईश्वर महादेव मुटकुळे (दोघे रा.मांडवा ता.आष्टी) यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक नवरी तिचे चार कारभारी
मुळ पाटोदा तालुक्यातील असलेली ३३ वर्षीय शारदा हिचे नाशिक, देवीनिमगाव व मांडवा असे तिघांसोबत लग्न झाल्याचे सांगण्यात आले. पहिला पती मयत झाला, दुसऱ्याने साेडले तर तिसऱ्याची फसवणूक केली. त्यानंतर चौथ्याच्या प्रेमात पडली. एक नवरी तिचे चार कारभारी असे म्हणण्याची वेळ आली आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles