15.9 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

‘लोकशाही” वृत्तवाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांच्यावरील गुन्हे त्वरित मागे घ्या

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
  • बीड जिल्हा सुतार समाज संघटनेची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी

बीड |

सुतार समाजाचे पत्रकारीतेतील लोकशाही चे मुख्य संपादक कमलेश सुतार यांच्या वरती जो गुन्हा दाखल केला आहे. त्या कृतीचा बीड जिल्हा सुतार समाजाचे वतीने जाहिर निषेध व्यक्त करून संपादक कमलेश सुतार यांच्यावरील गुन्हे शासनाने तात्काळ मागे घ्यावेत असे निवेदन बीड जिल्हा सुतार समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना सोमवार दि.११ सप्टेंबर रोजी देण्यात आले.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “लोकशाही’ वृत्त वाहिनीने भाजपा नेते किरीट सोमैय्या यांचे वृत्त कायद्याच्या चौकटीत राहून प्रक्षेपित केले होते .व तसा खुलासा देखील संपादकांनी आपल्या बातमी आधी केला होता .सदर प्रकरण हे विधी मंडळापर्यंत गेलेले असता विरोधी पक्षाने याबबाबत सखोल चॊकशीची मागणी केली आहे . ते प्रत्युत्तर देताना मा. गृहमंत्री ,मा.मुख्यमंत्री यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते .परंतु याबाबत चौकशी पूर्ण न करता मा. कमलेश सुतार (मुख्य संपादक ) यांचे वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो अतिशय अन्यायकारक व दडपशाही करणारा आहे. भारतीय लोकशाहीतील चौथा स्तंभ संबोधल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर अशा प्रकारे गुन्हे दाखल करून सरकार कडून दडपशाही केली जात आहे राज्यातील प्रमुख पत्रकारांची जर अशी परिस्थिती अशी असेल तर सर्वसामान्या जनतेचे काय ? अशी भीती आम्हा सामान्य नागरिकांना आहे. त्या मुळे ‘लोकशाही” वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांच्यावरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. व याच्या परिणामाची संपूर्ण जबाबदारी हि महाराष्ट्र सरकारची असेन असे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर बापूराव भालेकर, श्री पांचाळ सर (कळंब), सुभाष खोगरे, प्रमोद पांचाळ , पंढरीनाथ क्षिरसागरसर, प्रशांत डोरले, बाबूराव पांचाळ, संतराम सांगुळे, दत्तात्रेय मानकर,रविन्द्र भालेकर, ज्ञानेश्वर राजगुरु यांच्या सह अनेक समाज बांधव स्वाक्षऱ्या आहेत.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles