13.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

तुम्हाला किती मते मिळू शकतील, विरोधकांना किती मते मिळतील, विरोधात संभाव्य उमेदवार कोण? भाजपचे रिपोर्ट कार्ड तयार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई | 

उद्या निवडणूक झाली तर तुम्हाला किती मते मिळू शकतील, तुमच्या विरोधकांना किती मते मिळतील, तुमच्या विरोधात संभाव्य उमेदवार कोण, कोण असू शकतात, असे मुद्दे या अहवालात मांडण्यात आले आहे.

भाजपच्या राज्यातील सर्व विधानसभा सदस्यांना आमदार म्हणून त्यांचे ‘रिपोर्ट कार्ड’ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी हातात दिले. कुठे – कुठे कमी पडता ते आमदारांना सांगितले आणि सुधारणा करण्याची तंबीही दिली.

 

फडणवीस आणि बावनकुळे यांनी त्यासाठी येथील गरवारे क्लबमध्ये दिवसभर मॅरेथॉन बैठका घेतल्या. प्रत्येक आमदाराशी ते वैयक्तिक बोलले. भाजपने पक्षाच्या सर्व आमदारांच्या मतदारसंघात गेले काही दिवस सर्वेक्षण केले. त्यासाठी खासगी सर्वेक्षण संस्थांची मदत घेण्यात आली; याशिवाय पक्षाचे नेटवर्क, पक्षाचे पदाधिकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात फीडबॅक घेण्यात आला. त्या आधारे हे रिपोर्ट कार्ड तयार करण्यात आले. एकेका आमदाराचे रिपोर्ट कार्ड तब्बल साठ पानांचे आहे. प्रत्येक आमदाराला या रिपोर्ट कार्डच्या माध्यमातून आरसा दाखवण्यात आला.

रिपोर्ट कार्ड काय म्हणते 

आपल्या मतदारसंघात हे सर्वेक्षण कधी झाले, याची पुसटशी कल्पना कोणत्याही आमदाराला देण्यात आलेली नव्हती आणि रिपोर्ट कार्ड बघून अनेक आमदारांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्यात खूपच बारीकसारीक तपशील मतदारसंघाबाबत देण्यात आला आहे.

उद्या निवडणूक झाली तर तुम्हाला किती मते मिळू शकतील, तुमच्या विरोधकांना किती मते मिळतील, तुमच्या विरोधात संभाव्य उमेदवार कोण, कोण असू शकतात, हेदेखील या अहवालात मांडण्यात आले आहे.

 

मतभेद मिटवण्याचा सल्ला

प्रत्येक आमदाराशी फडणवीस, बावनकुळे आणि पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश हे १० ते १५ मिनिटे बोलले. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही आपले मित्रपक्ष आहेत. तीन पक्षांमध्ये आपल्या मतदारसंघात काही मतभेद असतील तर ते मिटवा. तिघांनी एकत्रितपणे लोकसभा निवडणुकीला सामोरे जायचे आहे, असेही आमदारांना बजावण्यात आले. प्रत्येक विभागाची एक बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि लोकसभा निवडणूक समन्वयक आ. श्रीकांत भारतीय यांनी विचार मांडले. आमदारांचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यामागची भूमिका त्यांनी सांगितली.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles