20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

जिल्ह्यातून चारा निर्यातीस बंदी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने भविष्यात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे. यामुळे आपल्या जिल्ह्यातील पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध व्हावा यासाठी जिल्ह्यातून चारा निर्यातीस बंदी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने आज दिले आहेत. भविष्यातील उत्पन्न होणारी चारा टंचाईची परिस्थिती लक्षात घेता, हे आदेश देण्यात आले आहेत..

 

बीड जिल्हयात सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. जिल्हयात भविष्यात पशुधनासाठी चा-याच्या उपलब्धतेची परिस्थिती गंभीर होणार आहे. जिल्हयात मागील वर्षीच्या पेरणी अहवालानुसार दि. 31.08.2023 रोजी 186458.77 मे. टन चारा शिल्लक असून तो अंदाजे 43 दिवस पुरेल त्यामुळे चा. याची उपलब्धता पाहता भविष्यात टंचाई भासण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तरी जिल्हयात उपलब्ध होणारा सर्व प्रकारचा चा-याची इतर जिल्हयात वाहतूक करणेस बंदी आणणे, जिल्हया बाहेरील निविदाधारकांना लिलाव देण्यात येवु नयेत. तसेच बीड जिल्हयात चारा टंचाई निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याकरीता बीड जिल्हयात उत्पादित होणारा किंवा सदयस्थितीत असणारा सर्व प्रकारचा वाळलेला, ओला चारा बीड जिल्हयाबाहेर वाहतुक करण्यास जिल्हाधिकारी बीड यांचे आदेश क्र./जिउपसबी / 2148/2023 दिनांक 31.08.2023 नुसार पुढील आदेशापर्यंत मनाई करण्यात आलेली आहे. असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles