पाटोदा |
पाटोदा तालुक्यात दुष्काळ जाहीर करून सरसकट दुष्काळी अनुदान देऊन सर्वाना मोफत स्वस्त धन्य दुकानातून रेशन व गॅस देऊन मजूर व उसतोड कामगार यांना दुष्काळी कामे उपलब्ध करून देण्यात यावेत. अशी मागणी पाटोदा कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग नागरगोजे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाटोदा तालुक्यातील शेतकर्यांनी खरीप हंगामात पेरलेल्या पिकांचे जून महिन्यापासून आजपर्यंत पाऊस नसला पडल्याने 100% नुकसान झालेले असून खरीप हंगाम पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. कोणताही गावतलाव अथवा पाझर तलावा मध्ये पाणी साठा शून्य टक्के असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. अशातच लोडशेडींग च्या नावाखाली महाराष्ट्र राज्य विदूत वितरण कंपनी कडून शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात कुचंबना झाली आहे. तसेच पाऊस न पडल्याने शेतकरी शेतमजूर हवाल दिल झाला असून पाटोदा तालुक्यात दुष्काळ जाहीर करून सरसकट दुष्काळी अनुदान देऊन सर्वाना मोफत स्वस्त धन्य दुकानातून रेशन व गॅस देऊन मजूर व उसतोड कामगार यांना दुष्काळी कामे उपलब्ध करून देण्यात यावेत. अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग नागरगोजे, संजय कांकरिया, ॲड. सुशील कौठेकर, अनिल जायभये, श्याम हुले, प्रदीप नागरगोजे, तात्यासाहेब लाड, गणेश थोरात, राजपाल शेंडगे, सचिन गाडेकर, गणेश खाडे, करण तांदळे, चंद्रशेखर साठे, आदीच्या सह्या आहेत.