-0.7 C
New York
Thursday, January 9, 2025

Buy now

spot_img

“देव आमचा जुगार खेळतो, भारतरत्न परत करा” , तेंडूलकराच्या घरासमोर बच्चू कडूंचं जोरदार आंदोलन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून टिव्हीवर पान-गुटखा, तंबाकू, पानमसाला, ऑनलाईन गेमिंक अशा अनेक जाहिराती दाखवल्या जात आहेत. प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरानं देखील या जाहिराती केल्या. त्यावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली. आज प्रहार संघटनेच्या वतीने सचिन तेंडूलकर यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली. यामुळे मुंबईत राजकीय वातावरण चांगलचं तापल्याचं दिसून आलं.

 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरविरोधात माजी मंत्री बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. सचिनच्या बंगल्यासमोर आज बच्चू कडूंनी जोरदार आंदोलन केलं. ऑनलाई गेमची जाहिरात करणं सचिननं थांबावावं अन्यथा भारतरत्न परत करावं अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. आज प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सचिनच्या घरासमोर जोरदार घोषणाबाजी देखील केली.

 

परत करा, परत करा. भारतरत्न परत करा. देव आमचा जुगार खेळतो, वंदे मातरम आदी घोषणा प्रहारच्या कार्यकर्त्यांनी देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी बच्चू कडू यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. परंतु बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. यामुळे बच्चू कडू यांना वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

 

दरम्यान, प्रत्येक गणपतीच्या मंदिरासमोर आम्ही दानपेटी ठेवणार आहोत. जेवढा पैसा जमा होईल तेवढा निधी सचिन तेंडुलकर यांना देण्यात येणार आहे. सचिन तेंडुलकर यांना आर्थिक विवंचना असेल तर त्यांना दान गोळा करून दिलं जाईल. त्यांना चांगली बुद्धी द्या. असं साकडं आम्ही गणपतीला घालणार आहोत. अस बच्चू कडू यांनी म्हटलंय.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles