20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

शरद पवारांनी बीड जिल्ह्याला काय दिलं?- धनंजय मुंडे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीडमध्ये अजित पवार यांनी आज उत्तरसभा घेतली. या सभेत धनंजय मुंडे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले. मुंडे यांनी अजित पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख केला. यावेळी त्यांनी शरद पवार यांना थेट प्रश्न केला.

धनंजय मुंडे म्हणाले, मला अनेकांनी विचारलं हे उत्तरसभा आहे का? मी सांगितलं दादांची सभा उत्तराची नाही. तर बीडमधील मायबाप जनतेची आहे. १७ तारखेच्या सभेत सांगितल की जिल्ह्यांने साहेबांना प्रेम दिल. मात्र साहेबांनी जिल्ह्याला काय दिलं हा प्रश्न आहे. आजपर्यंत बीड जिल्ह्याला कुणी काही दिलं असेल तर ते अजितदादांनी दिलं. ही उत्तरदायीत्वाची सभा आहे. शरद पवारांचे उत्तरदायीत्व म्हणून अजित पवारांनी जिल्ह्याला दिलं.

बीडमधील दुष्काळ दूर करण्यासाठी ही सभा आहे. उगाच अजितदादा एकच वादा म्हणत नाहीत. चित्रपटातील वर्णन करायचे झाले तर मै जो बोलता हू, वो करके दिखाता हू. अजित पवार यांनी विकासाठी घोषणा कराव्या. विकासाचा वादा करावा. बीड जिल्हा कधीही अजित पवारांचे उपकार विसरणार नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यासाठी अनेक मागण्या केल्या. धरणातून पाणी आणण्यासाठी काय करावे ते करा, यामुळे जिल्हा दुष्काळमुक्त होईल.

१७ तारखेला माझा इतिहास विचारला. माझ्यासाठी शरद पवार देव आहेत. देवाने आज्ञा केली तर मला मान्य करावी. २०१० मला भाजपमधून मला काढलं. तेव्हा विधान परिषदेची उमेदवारी मिळाली. तेव्हा दोन मते मला कमी मिळाली. निवडून येऊ शकलो नसतो. मला न बोलता ती दोन मते अजितदादांनी दिली. हे मी कधीही विसरणार नाही. तर अजितदादांचे नेतृत्व मी स्विकारलं तर काय चूक केली.

दादा आणि शरद पवार साहेबांपासून मी संघर्ष शिकलो. प्रश्न कसे सोडवायचे हा माझा इतिहास आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर मी भाजपच्या आमदारकीचा राजीनामा दिला. २०१४ ला विरोधीपक्षनेते पदाची जबाबदारी दादांशिवाय कोणी दिली असेल असे वाटत नाही. २०१४ पासून २०१९ पर्यंत सर्वात मोठा संघर्ष मी केला. हे शरद पवार यांनी सांगितलं आहे. हा माझा इतिहास आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडे म्हणाले, विधानपरीषदेतील कामगिरीचे शरद पवार यांनी कौतुक केले आहे. माझी कर्तबगारी पवारांच्या पुस्तकात हाच माझा इतिहास. २०१९ चा इतिहास मी सांगणार नाही कारण मला पहाटे उठायची सवय नाही. सर्व सभेंचे रेकॉर्ड आज मोडले गेले आहेत. संघर्ष माझ्या पाचवीला पुजला आहे. मंत्री आहे तोही कृषी विभागाचा. मी अडचणी सांगणार नाही. मंत्री असताना देखील माझ्यासमोर संघर्ष आहे.

मंचावर येऊन कोणी जात काढत असेल तर हे शरद पवार यांचे संस्कार नाहीत, असा टोला धनंजय मुंडे यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles