32.7 C
New York
Wednesday, July 30, 2025

Buy now

spot_img

“राष्ट्रवादीला २००४ साली मुख्यमंत्रीपद मिळालं असतं, पण.”, अजित पवारांचं विधान

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार यांचं शनिवारी ( २६ ऑगस्ट ) बारामतीत आगमन झालं. ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव आणि हारतुरेच्या माध्यमातून अजित पवारांचं स्वागत करण्यात आलं.यानंतर अजित पवार यांनी बारामतीतील जनतेला संबोधित केलं. तेव्हा अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केलं आहे.

 

“२००४ साली राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं. पण, आता मी काय करणार? मला काही गोष्टी बोलता येत नाही. तेव्हा सोनिया गांधी यांनी विलासराव देशमुख यांना सांगितलं, ‘राष्ट्रवादीचे जास्त आमदार निवडून आले आहेत. त्यांचे आमदार त्यांचा मुख्यमंत्री ठरवतील.’ मात्र, मुख्यमंत्री होऊ शकला नाही.”

“उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला. त्यावेळीही, शिवसेनेचे ६५ तर राष्ट्रवादीचे ५४ आमदार होते. मात्र, अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा झाली नाही. सध्या मला उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. त्याला न्याय देण्यासाठी रात्रीचा दिवस करू,” असं अजित पवारांनी म्हटलं.

 

“कारखानदारी अडचणीत आहे. यंदा ऊस कमी आहे. गाळप किती दिवस होईल, याची माहिती नाही. माळेगावातील लोकांना ३३५० पेक्षा ऊसाला भाव मिळेल. पण, छत्रपती कारखान्याचं काही विचारू नका. सोमेश्वर कारखान्यात गडबड झाली. तशीच छत्रपती कारखान्यात झाली आहे. छत्रपती कारखान्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच त्यात यश मिळेल,” असं अजित पवारांनी सांगितलं.

 

“अन्यही संस्था चांगल्या पद्धतीने चालवू. बारामती आणि जिल्ह्याचं भलं करण्याचं करू. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना खेचून आणण्याचा प्रयत्न करू. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस मी आणि सहकाऱ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास करण्याची ग्वाही देतो,” असेही अजित पवारांनी म्हटलं.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles