21.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

आमचे म्हणणे ईश्वराने ऐकले आणि आम्हाला आशिर्वाद दिला- धनजंय मुंढे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई |

आम्ही आमच्या देवाला इतकेच म्हणत होतो की कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या.आणि आज शरद पवारांचे वक्तव्य आले. त्यामुळे आमचे म्हणणे ईश्वराने ऐकले आणि आम्हाला आशिर्वाद दिला.हाच शरद पवारांच्या वक्तव्याचा अर्थ निघतो, अशी प्रतिक्रिया राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी अजित पवारांबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली नाही. अजित पवार आमचेचे नेते आहेत, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत. याच संदर्भात धनंजय मुंडे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. हा देवाचाच आशिर्वाद म्हणायचा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

 

बीडमधील सभा कोणालाही उत्तर देण्यासाठी नाही. तर उत्तरदायीत्वासाठी ही सभा आहे. बीडच्या विकासाच्या मुद्द्यांसाठी ही सभा आहे. मराठवाड्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे, असं ते म्हणाले. देवाकडे आम्ही प्रार्थना करत होतो की आम्हाला आर्शीवाद मिळावा. तोच अर्थ शरद पवारांच्या वक्तव्यानंतर निघतो की त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला आहे, असंही ते म्हणाले.

 

पक्षामध्ये फूट पडली नाही. लोकशाहीमध्ये कोणी वेगळा विचार केला तर पक्ष फुटला असा याचा अर्थ होत नाही, असं शरद पवार म्हणाले. आम्हाला वाटत होतं की पक्षातील बहुसंख्य लोकांची वेगळी इच्छा आहे. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद मिळावा. तो आर्शीवाद आज आम्हाला देवाकडून मिळाला आहे, असं मुंडे म्हणाले.

 

मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता निर्माण झाली आहे. दोन जिल्ह्यातच अतिवृष्टी झाली आहे. इतर जिल्ह्यात स्थिती गंभीर आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्व गंभीर होणार आहे. त्यामुळे यासंदर्भात आज बैठक होणार आहे. शेतकऱ्यांवर आलेल्या संकटात सरकार पाठीशी खंबीरपणे उभा आहे. नाफेडच्या खरेदीमध्ये नवीन कसल्याही अटी नाही. २४१० प्रति क्विंटल दराने खरेदीचा केंद्राचा निर्णय आहे. २ लाख टन खरेदी सुरु आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

काही ठिकाणी शेतकऱ्यांची मागणी आहे की, नाफेडने येथे येऊन कांदा खरेदी करावा.केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. शेतकऱ्यांचे समाधान होईल असा मार्ग काढला जाईल, असंते म्हणाले.

 

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles