19 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

भाजपचे ‘दुकान’ जोरात, पण नवीन ग्राहकच जास्त!; स्वपक्षाच्या सद्य:स्थितीबाबत गडकरींची मार्मिक टोलेबाजी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

”जनसंघाच्या लाखो कार्यकर्त्यांनी प्रवाहाविरुद्ध जाऊन काम केले. भाजपच्याही जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी त्याग, बलिदान, समर्पण ही तत्त्वे पाळून पक्षासाठी खस्ता खाल्ल्या. परंतु, आज चित्र बदलले आहे. आता भाजप मोठा झाला आहे, दाही दिशांना विस्तारला आहे. भाजपचे ‘दुकान’ जोरात सुरू आहे. मात्र या ‘दुकाना’त नवीन ग्राहकच जास्त दिसत आहेत. जुने काही दिसत नाहीत”, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वपक्षाच्या सद्यस्थितीवर शुक्रवारी मार्मिक टोलेबाजी केली.

 

गर्दे वाचनालयात भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते गोकुल शर्मा यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. गडकरी यांनी भाजपच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा धावता आढावा घेतला. जुन्या निष्ठावान आणि समर्पित पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आदरपूर्वक स्मरण करताना गडकरी म्हणाले, ”मला महामंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला, तेव्हा इतर ज्येष्ठांचा विचार करण्याची विनंती मी केली होती. मात्र, ‘नितीन, आम्ही पक्षाचे वर्तमान आहोत, तू भविष्य आहेस’ असे सांगून या ज्येष्ठांनी मलाच महामंत्री पद स्वीकारण्याची गळ घातली. तेव्हाचे राजकारण असे होते.

 

राजकारण म्हणजे समाजकारण, राष्ट्रकारण असा त्याचा अर्थ होता. आज मात्र राजकारणाचा बाज बदलला आहे, व्याख्या बदलली आहे. आजचे राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण झाले आहे. लाखो जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी त्याग, बलिदान, समर्पण या तत्त्वाने काम केले. म्हणून आज पक्षाची उत्तुंग इमारत उभी राहिली. त्याचमुळे माझ्यासारखा कार्यकर्ता आज शिखरावर पोहोचला. आता पक्ष मोठा झाला, दाही दिशांना विस्तारला, पण जुने कार्यकर्ते फारसे दिसत नाहीत, नवीनच जास्त दिसतात.” या सोहळय़ाला खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय कुटे, संजय रायमूलकर, श्वेता महाले, संजय गायकवाड, माजी आमदार चैनसुख संचेती, काँग्रेस नेते गणेश पाटील, हर्षवर्धन सपकाळ हजर होते.

 

  • लाखो जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी त्याग, बलिदान, समर्पणाने काम केले म्हणून आज पक्षाची उत्तुंग इमारत उभी राहिली. आता पक्ष मोठा झाला, दाही दिशांना विस्तारला, पण जुने कार्यकर्ते फारसे दिसत नाहीत, नवीनच जास्त दिसतात. आजचे राजकारण केवळ सत्ताकारण झाले आहे.
  • –नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles