13.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

भरधाव ट्रकच्या धडकेत बीड येथील न्यायाधीशांचा मृत्यू; रेणापूर-उदगीर मार्गावर रात्री १० वाजेची घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

रेणापूर |

भरधाव ट्रकने ओमनीला दिलेल्या धडकेत बीड येथील न्यायाधीश आणि त्यांचा चालक जागीच ठार झाल्याची घटना रेणापूर- उदगीर मार्गावरील सेवादासनगर तांडा येथे घडली. हा अपघात शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडला.तो एवढा भीषण हाेता की, यात ओमनी कारचा पार चेंदामेंदा झाला.

 

पाेलिसांनी सांगितले, उद्धव वसंत पाटील (रा. अजनसोंडा खु., ता. चाकूर) हे सध्याला बीड येथे दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून कार्यरत हाेते. शुक्रवारी ते चालक बळी नंदकुमार टमके (रा. अजनसोंडा खु., ता. चाकूर) यांच्यासाेबत ओमनीने (एमएच १७ बीव्ही १२५७) गावाकडे निघाले हाेते. दरम्यान, रेणापूर- उदगीर मार्गावरील आष्टामाेडकडे जाताना सेवादासनगर तांडा येथे शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास भरधाव ट्रकने (एमएच २४ एबी ८४०१) त्यांच्या वाहनाला जाेराची धडक दिली. यामध्ये न्यायाधीश पाटील आणि चालक टमके हे जागीच ठार झाले. हा अपघात एवढा भीषण हाेता की, ट्रक शंभर फुटावरून चुकीच्या दिशेने येत न्यायाधीशांच्या वाहनावर धडकला. घटनास्थळावरून ट्रकचालक पसार झाला.

 

घटनास्थळी तांड्यावरील युवक, नागरिकांनी धाव घेतली. ओमनी वाहनाचा पार चेंदामेंदा झाल्याने त्या दाेघांनाही बाहेर काढण्यासाठी दीड तासाचा अवधी लागला. रेणापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, तेथील डाॅक्टरांनी मृत घाेषित केले.

 

वर्षभरापूर्वीच झाली हाेती निवड…

न्यायाधीश उद्धव पाटील हे गत अनेक वर्षांपासून लातूर येथे वकिली करत होते. दरम्यान, त्यांची एक वर्षापूर्वीच न्यायाधीश म्हणून निवड झाली हाेती. सध्या बीड जिल्हा न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. शनिवार- रविवार सुटी असल्याने ते गावाकडे रेणापूर- उदगीर मार्गावरून शुक्रवारी निघाले होते. मात्र, त्यांच्यावर काळाने घाला घातला. यातच ते आणि चालक जागीच ठार झाले.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles