-0.1 C
New York
Thursday, December 11, 2025

Buy now

spot_img

चालत्या गाडीत महिलेवर तिघांचा अत्याचार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड शहरांमध्ये चालत्या गाडीत एका महिलेवर तिघां जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून आज शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्रियकरासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका 26 वर्षीय महिलेच्या पतीचे कोरोनात निधन झाले. या यानंतर गेल्या वर्षभरापासून त्या महिलेचे एका व्यक्तीबरोबर संबंध होते, वर्षभरापासून हे दोघेही शहरांमध्ये राहत होते. परंतु, काल पीडित महिला बार्शी रोडवरून येत असताना, एका स्कॉर्पिओमध्ये तिच्या प्रियकराने व त्याच्यासोबत असलेल्या दोघांनी महिलेस स्कॉर्पिओमध्ये बळजबरिने बसवून गाडी मांजरसुब्याच्या दिशेने सुसाट नेली. बीड ते मांजरसुंबा या दरम्यान प्रियकरासोबत असणाऱ्या दोन नाराधमांनी महिलेला मारहाण करत तिच्यावर अतिप्रसंग केला. यानंतर गाडी सात्रा पोत्रा या ठिकाणी गेल्यानंतर प्रियकराच्या पत्नीनेसुद्धा पीडित महिलेला मारहाण केली.

 

यामध्ये महिला जखमी झाली असून महिलेवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. पीडितेच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्रियकर सह अन्य दोघे व एका महिलेवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles