21.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

लाच घेतल्याप्रकरणी महिला तलाठीला चार वर्षे तुरुंगवास

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

लाच घेतल्याप्रकरणी पाथर्डी तालुक्‍यातील चिंचपूर पांगूळ येथील तत्कालीन तलाठी शुभांगी ससाणे हिला जिल्हा व सत्र न्यायालयाने चार वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

सात वर्षांपूर्वी म्हणजे 28 ऑगस्ट 2016 रोजी चिंचपूर पांगूळ येथील पांडुरंग बडे यांचे वडील मयत झाल्याने भावांसह वडिलोपार्जित जमिनीचे वारस पत्रानुसार नाव नोंदणी करायची होती. यासाठी बडे हे तत्कालीन तलाठी शुभांगी ससाणे यांच्याकडे गेले.त्यांनी वारसपत्रानुसार नाव नोंदणी करायची असल्याचे सांगितले. त्यासाठी 10 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती तीन हजार रुपये घेणार असल्याचे ससाणे यांनी सांगितले.

 

दरम्यान, ही बाब तक्रारदार बडे यांनी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळविली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुभांगी ससाणे हिला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. तसेच न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.

 

न्यायालयाने पंचांसह चार साक्षीदारांच्या साक्ष व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपी ससाणेला दोषी ठरवले. न्यायालयाने शुभांगी ससाणे हिला चार वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा व 10 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिने कैदेची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील ऍड. मंगेश दिवाणे यांना पैरवी अधिकारी संध्या म्हस्के व पोलीस हवालदार कृष्णा पारखे यांनी सहकार्य केले.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles