13.9 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

लाचखोर ग्रामसेवकाला पाच वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

जालना जिल्ह्यातील एक ग्रामसेवक महबूब अमीन मासुलदार याने एका व्यक्तीचे सरकारी काम करून देण्यासाठी एक हजार रुपयांची स्वीकारली होती. यावेळी त्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना येथील पथकाने सापळा रचून जेरबंद केले होते.

या प्रकरणाचा निकाल विशेष न्यायाधीश के. एम. जयस्वाल यांनी बुधवारी दिला असून आरोपी ग्रामसेवकाला पाच वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

 

याप्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सहकारी वकील भारत खांडेकर यांनी काम पाहिले. ग्रामसेवक आरोपी महेबुब अमीन मासुलदार (रा. तुकाराम नगर, मंठा, जि.जालना,मुळ रा. तावशीगड ता.लोहारा जि. धारााशिव) याला कलम 7 लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये चार वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व दहा हजार रूपये दंड व कलम 13(2) अन्वये पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व दहा हजार रूपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावली.

 

2 मे 2016 रोजी फिर्यादी हा ग्रामसेवकाला ग्रामपंचायत अंभोरा शेळके ता. मंठा येथे कामानिमित्त भेटण्यास गेला असता फिर्यादी यांचे वारसा हक्काचा फेर व वाटणी पत्रकाचा फेर घेण्यासाठी ग्रामसेवक महेबुब अमीन मासुलदार यांनी दोन हजार रूपयाची मागणी केली व फिर्यादीने लगेच पाचशे रुपये आरोपीस दिले व उर्वरित दीड हजार रूपये व कागदपत्र घेवुन ये असे आरोपीने ग्रामसेवकाने फिर्यादीस सांगितले. फिर्यादी यास लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे फिर्यादीने 3 मे 2016 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय जालना येथे आरोपी विरुद्ध फिर्याद दाखल केली व त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक कर्यालयातील पोलीस उपअधिक्षक प्रविण मोरे यांनी फिर्यादीचे अवलोकन करून त्याच दिवशी लाच मागणी पडताळणी घेण्याचे ठरविले. त्यादिवशीय सापळा पथक, पंच व फिर्यादी तात्काळ मंठा येथे गेले असता त्याच दिवशी आरोपीने फिर्यादीकडे दोन हजार रूपये लाचेची मागणी केली व आरोपीने फिर्यादीकडुन दीड हजार रूपयांची लाच स्वीकारली. 3 मे 2016रोजी जालना लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाचे पोलीस उपअधिक्षक प्रवीण मोरे यांनी आरोपी विरुध्द पोलीस ठाणे मंठा येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल केला.

 

पोलीस उपअधिक्षक प्रवीण मोरे यांनी तपास केला व संपूर्ण तपास झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकार पक्षातर्फे या प्रकरणात एकूण 3 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी पंच साक्षीदार व पोलीस उपअधिक्षक प्रवीण मोरे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकल्यानंतर व न्यायालयापुढे आलेल्या साक्षीपुराव्या वरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश -4 किशोर एम.जयस्वाल यांनी आरोपी महेबुब अमीन मासुलदार याला पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व दहा हजार रूपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारपक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील व अतिरीक्त सरकारी अभियोक्ता अ‍ॅड भारत के. खांडेकर यांनी काम पाहिले व त्यांना जिल्हा सरकारी कार्यालयातील कर्मचारी, लाचलुचपत कार्यालयातील कर्मचारी यांनीमो लाची मदत केली.

 

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles