13.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

ज्येष्ठ साहित्यिक, कवी, गीतकार ना. धों. महानोर यांचे निधन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

प्रसिद्ध निसर्गकवी प्रसिद्ध कवी ना. धो. महानोर यांचे निधन, वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. पुण्यातील रुबी हॉस्पीटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

जेष्ठ कवी ना. धो. महानोर यांचे निधन. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे सकाळी साडेआठ वाजता निधन. उद्या पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटीलेटरवर होते.

 

ना. धों. महानोर यांचा परिचय

 

१६ सप्टेंबर १९४२ ला जन्मलेल्या ना. धों. महानोर गेली ६० हून जास्त वर्षे कवितेची साधना करीत आले आहेत. मराठी काव्यविश्‍वात निसर्गकवी म्हणून महानोरांना ओळखले जाते.

 

महानोरांचा जन्म पळसखेडच्या शेतकरी कुटुंबात झाला. आई-वडील दुसऱ्याच्या शेतात राबत असत. महानोरांना चार भाऊ आणि तीन बहिणी. ते सगळ्यांत थोरले. प्राथमिक शिक्षण पळसखेडला झाल्यानंतर वयाच्या दहाव्या वर्षी ते पुढील शिक्षणासाठी ८-१० कि.मी. अंतरावर असलेल्या शेंदुर्णीच्या शाळेत दाखल झाले. शेंदुर्णीच्या शाळेतच कवितेशी त्यांची ओळख झाली, कवितेची गोडी लागली. शाळेत असताना शाळेच्या नाटकांमधून त्यांनी कामंही केली.

 

रानात राहणारा निसर्ग कवी

 

मॅट्रिक झाल्यानंतर ते जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयात कला शाखेत दाखल झाले. या महाविद्यालयात म. ना. अदवंत, राजा महाजन अशा ‘साहित्यिक’ प्राध्यापकांकडून महानोरांना भरपूर प्रोत्साहन मिळालं, परंतु घरातल्या अडचणींमुळे वर्ष पूर्ण होण्याच्या आतच शिक्षण सोडून त्यांना गावी जाणं भाग पडलं. त्यांच्या वडिलांनी स्वत:ची पाच एकर कोरडवाहू जमीन विकत घेतली होती आणि शेतीच्या कामांसाठी वडिलांना त्यांची गरज होती. महानोरांचं शिक्षण थांबलं आणि ते शेतीत रमले. मा.ना. धों. महानोर या रानकवीने मराठी साहित्यावर अमीट नाममुद्रा उमटवली आहे. त्यांच्या अद्भुत निसर्गकवितांनी, त्यातल्या रंग-गंधांनी, नदीच्या प्रवाहासारख्या नाद-लयींनी वाचक-रसिकांना वेड लावलं आहे. रानात राहणारा हा कवी निसर्गाची भाषा बोलतो, निसर्गाशी संवाद करतो, रसिकाचं बोट धरून त्याला निसर्गात घेऊन जातो. निसर्ग आणि स्त्री ही महानोरांच्या कवितेची केंद्रस्थानं आहेत. या कवितेत निसर्गाचे विविध गंध आहेत, विविध ध्वनी आहेत, निसर्गाच्या स्पर्शाने फुललेला व रोमांचित करणारा शृंगार आहे.

 

अजिंठा आणि महानोर यांचं वेगळं नातं

 

अजिंठ्याच्या पायथ्याशी वसलेले पळसखेडे हे छोटेसे गाव. त्या काळात दीड हजार लोकवस्तीचे. शेत-शिवाराचे. अजिंठ्याला चिरकालीन अक्षरशिल्प आहे. महानोरांनी आपल्या अक्षरांनी असेच चिरस्मरणीय शिल्प घडविले. पळसखेडची लोकगीते त्यांनी जिव्हाळ्याने संकलित केली. ‘पळसखेडची गाणी’ त्यांनी आईला अर्पण केली. या अर्पणपत्रिकेत मिताक्षरांत महानोर सांगून जातात

 

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles