-8 C
New York
Wednesday, January 28, 2026

Buy now

spot_img

30 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या; बीड शहरात खळबळ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

बीड शहरात एका ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरापासून काही अंतरावर असलेल्या चऱ्हाटा रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाच्या बाजूला ही घटना घडली.याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात वारंवार गंभीर गुन्ह्याच्या घटना समोर येत आहेत. नुकतीच शहरात ३० वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. प्राथमिक माहितीवरून पांडुरंग नारायण माने (रा.आनंदवाडी, ता.जि.बीड) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनास्थळावर मृतदेहाच्या बाजूलाच (MH-23 AM – 7094) या क्रमांकाची दुचाकीही सापडली आहे.

 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. नेमकी तरुणाची हत्या कोणी केली ? हत्येचे कारण काय ? याचा तपास बीड ग्रामीण पोलीस करत आहेत. शहरापासून काही अंतरावर ही धक्कादायक घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles