23.9 C
New York
Monday, July 21, 2025

Buy now

spot_img

नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय; आयपीएस पंकज कुमावत यांनी धाड टाकून केली 3 महिलांची सुटका

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

बी ड शहरातील घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या एका हॉटेलमधील वेश्या व्यवसायावर आयपीएस पंकज कुमावत यांनी धाड टाकून 3 महिलांची सुटका केली.

 

शुक्रवारी सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना खबऱ्याद्वारे माहिती मिळाली की, सोलापुर – धुळे राष्ट्रीय महामार्गाचे बाजुस चौसाळा शिवारात मेन रोड लगत चौसाळा येथिल दशरथ तानाजी थोरात यांच्या मालकीचे जानकी हॉटेल, बियरबार व लॉजींग आहे. तेथे दुसऱ्या मजल्यावर जालना जिल्यातील अंबड तालूक्यातील महाकाळ येथिल गणेश मच्छीद्र लहाणे,चौसाळा येथिल दिनेश प्रल्हाद सोनवने तसेच दशरथ तानाजी थोरात हे वेश्या व्यवसाय करून घेत आहेत.

 

या ठिकाणी हॉटेल चालवणारे दशरथ थोरात यांनी स्वतःच्या फायद्यासाठी काही महीलांना पैशाचे अमिष दाखवत पर पुरुष ग्राहकां सोबत शारीरीक संबंध ठेवण्या साठी भाग पाडत आहेत, आणि आलेल्या पैशांची वाटणी करुन घेवुन महीलांकडुन वेश्या व्यवसाय करुन घेत आहे. अशी माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने या जानकी हॉटेल मधे जाऊन डमी ग्राहक पाठवुन पडताळणी केली. त्यानंतर स्वतः पंकज कुमावत यांनी आपल्या पथकासह जानकी हॉटेल, मधील दुसऱ्या मजल्यावर छापा मारला.

 

यावेळी तीन महिलांची सुटका करण्यात आली तर काही ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले, ग्राहकांसह मालकावर नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर , अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर अंबाजोगाई , अप्पर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत पीआय पवार, अतिश देशमुख , राजू वंजारे , गित्ते, प्रभा ढगे, संतराम थापडे, गणेश नवले, तुकाराम कानतोडे, युवराज चव्हाण यांच्या पथकाने केली पुढिल तपास विलास हजारे करत आहेत.

 

बीड मधे स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी नुकतीच धाड टाकली होती. यावेळी तीन पिडितांची सुटका करत उर्वरितांना ताब्यात घेण्यात आले होते. केज तालुक्यातील एका कला केंद्रावर अशीच कारवाई करत तेथे सुरु असलेले महिला व अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण रोकले होते. या धाडीत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्यासह काही पुरुष आणि महिला मिळून 36 जणां विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. आपल्या परिसरात अशा प्रकारचे अवैध धंदे चालू असल्यास त्याची माहिती तात्काळ कळवावी. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles