18.9 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

माजी खासदार विजय दर्डा यांना 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

नवी दिल्ली |

माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा यांना दिल्लीच्या विशेष न्यायालयाने 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, मे. जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांनाही छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपातील अनियमिततेच्या प्रकरणात चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याच प्रकरणात न्यायालयाने माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता, दोन ज्येष्ठ लोकसेवक केएस क्रोफा आणि केसी सामरिया यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

 

छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपात झालेल्या अनियमिततेच्या प्रकरणांत दिल्ली विशेष न्यायालयात विशेष न्यायाधीश संजय बंसल यांनी सर्व आरोपींना दोषी ठरवले होते. या प्रकरणात राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र, कोळसा विभागाचे माजी सचिव एच सी गुप्ता, के एस क्रोफा आणि केसी सामरिया, जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड तसेच संचालक मनोज कुमार जयस्वाल यांचाही समावेश आहे.

 

विजय दर्डा तसेच देवेंद्र दर्डा, जेएलडी यवतमाळ एनर्जीचे संचालक मनोज जयस्वाल यांच्यासह सात जण या प्रकरणात न्यायालयात दोषी ठरले. यात तीन आयएएस अधिकाऱ्यांना तीन-तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सात जणांना दोषी ठरवल्यानंतर आज या प्रकरणात शिक्षे बाबत सुनावणी झाली.

 

कोळसा खान वाटप प्रकरणात १९९९ ते २००५ या काळात जुने ब्लॉक्स आले. त्याची माहिती असतानागी संबंधित माहिती लपवून अवैध मार्गाने कंत्राट मिळवले. असा आरोप विजय दर्डा आणि इतर सात आरोपींवर होता. युपीए सरकारच्या काळात जे घोटाळे गाजले त्यातील हा एक प्रमुख घोटाळा मानला जात होता. या प्रकरणात सीबीआयने २०१२ ला ‘क्लोजर रिपोर्ट’ही दिला होता. तेव्हा न्यायालयाने मात्र तो फेटाळला. गेल्या नऊ वर्षांत आम्ही न्यायालयाच्या चकरा मारतोय, आधीच आम्ही वेदना भोगतोय. त्यामुळे शिक्षेचा कालावधी कमी करण्यात यावा अशी मागणी आरोपींच्या वतीने करण्यात आली होती.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles