15.9 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

बीडमधील स्पा सेंटरवर धाड, स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होता वेश्या व्यवसाय

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

 

बीडमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती थेट पंकज कुमावतांना मिळानी होती. त्यांनी माजलगावच्या पोलिस उपअधिक्षक श्वेता खाडे यांना पाठवून बीडमध्ये धाड टाकली. यावेळी तीन पिडीतांची सुटका करण्यात आली, तर एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. ही कारवाई सोमवारी दि. 24 जुलै रोजी रात्री 9 च्या दरम्यान करण्यात आली.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जालना रोडवर मोठा चौकातील एका शोरुमच्या पुढे जालणारोडवर इमारतीतमध्ये स्पा सेटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती थेट आयपीएस पंकज कुमावत यांना मिळाली होती. त्यानंतर कुमात यांनी माजलगावच्या पोलिस उपअधिक्षक स्वेता खाडे यांना आपल्या पथकासह धाड टाकण्यासाठी पाठवले. पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून खात्री केली. यानंतर धाड टाकली असता तीन पिडीतांची सुटका करण्यात आली. एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पंडकर, अंबाजोगाई अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने पथकातील पोलिस उपअधिक्षक श्वेता खाडे, पोह 1640 अतिश देशमुख, पो.ह.1685 अशोक नामदास, म.पो.ना.1898 ढगे, पोका 2299 संतराम थापडे,पोका 661 तुकाराम कानतोडे व पोका 1510 चव्हाण, यांनी केली.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles