15.9 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

शेतकरी उपाशी, मंत्री तुपाशी.विरोधकांची घोषणाबाजी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
  • विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन

मुंबई |

आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज विरोधीपक्षनेता कोण हे ठरण्याची शक्यता आहे. तर काल पहिल्या दिवशी विरोधकांनी सभात्याग करत, गोंधळ घातला, त्यामुळं थोड्या वेळातच दोन्ही सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले होते. आज अधिवेशनाच्या दुस-या दिवसही सुरुवातीलाच विरोधक आक्रमक झाल्याचे पाहयला मिळाले. विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले.

 

शेतकरी उपाशी, मंत्री तुपाशी.विरोधकांची घोषणाबाजी

दरम्यान, दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी शेतकरी विरोधी ‘कलंकित’ घटनाबाह्य सरकारचा धिक्कार असो., खोक्यावर खोके . मंत्री झाले बोके., शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार.विम्या रक्कम न देणाऱ्या सरकारचा धिक्कार.लोकशाही गळा घोटणाऱ्या सरकारचा धिक्कार.,असे म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. शेतकरी उपाशी, मंत्री तुपाशी

शेतकरी विरोधी, शेतकऱ्यांवर अन्याय, करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो! शेतकऱ्यांचे केले हाल, मंत्री झाले मालामाल! किरीट सोमय्याचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणाबाजी आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी एकत्र येत आंदोलन केले. आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. तसेच हातात बॅनर घेऊन विरोधकांचे आंदोलन केले.

 

किरीट सोमय्यांविरोधात घोषणाबाजी

दुसरीकडे आक्षेपार्ह व्हीडिओप्रकरणी किरिट सोमय्या चांगलेच अडचणीत आले असून, यामुळं राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. दरम्यान, विरोधकांनी लढगे जितगे अश्या घोषणाबाजी दिली. तसेच अनेकांचे राजकीय जीवन उद्धवस्त करणाऱ्या किरिट सोमय्याविरोधात देखील विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles