20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

जर शारिरीक संबंध सहमतीने असेल तर तो बलात्कार असू शकत नाही; कोर्टाने आरोपीला केले बलात्कार केल्याच्या आरोपातून मुक्त

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्याबाबत वयोमर्यादा कमी करण्याच्या चर्चांदरम्यान आता ओडिसा हाय कोर्टने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. हाय कोर्टाने 10 वर्ष जेल मध्ये असलेल्या एका 45 वर्षीय व्यक्तीला मुक्त केले आहे.

या व्यक्तीवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. त्यावेळेस पीडीतेचं वय 17 वर्ष होतं. कोर्टाने आरोपीची मुक्तता करताना पीडीतेच्या बाजूवर बोलताना आरोपीला दोषी ठरवताना रेकॉर्ड वरील पुराव्यांवरून तो बलात्कार असल्याचं सिद्ध होत नसल्याचं म्हटलं आहे.

 

न्यायमूर्ती एस के साहू यांनी त्यावर बोलताना रेकॉर्ड वरून असं वाटत आहे की तरूणी तेव्हा 17 वर्षांची होती. ती आपल्या मर्जीने आरोपी सोबत जंगलामध्ये जात होती. नियमित त्यांचा शारीरिक संबंध येत होता. हायकोर्टाने सांगितले की या मुलीला ठाऊक होते तो मुलगा विवाहित आहे. त्याला चार मुलं आहेत. तिने सहमतीने शारीरिक संबंध ठेवले होते. जो पर्यंत ही मुलगी गर्भवती राहिली नाही तोपर्यंत तिला कोणताही आक्षेप नव्हता तसेच तिनेही कुणाला सांगितलं नव्हतं.

 

न्यायमूर्ती साहू यांच्या मते ‘आरोपीने मुलीला लग्नाचं वचन दिलं नव्हतं. तसेच हे लग्न होणार नसल्याचंही ठाऊक होतं कारण तो आधीच विवाहित आणि मुलाबाळा सोबत आहेत. मुलीच्या वडिलांनी त्या व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. 5 वर्षांनंतर 14 ऑगस्ट 2018 मध्ये सुंदरगड च्या न्यायालयाने शांतनूला बलात्कारी म्हणून दोषी ठरवलं होतं. यामध्ये कौडीने 2019 साली हायकोर्टात आव्हान दिलं होतं. न्यायालयाने सांगितलं जर पीडीता हे सांगत असेल की तिच्या मर्जीने शारीरिक संबंध ठेवले गेले आहेत तर हा बलात्कार असू शकत नाही.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles