24.1 C
New York
Friday, July 18, 2025

Buy now

spot_img

छगन भुजबळांनंतर धनजंय मुडेंना धमकीचा फोन; मागितली 50 लाखांची खडणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजितदादांच्या गटासोबत गेलेल्या छगन भुजबळांनंतर आता धनंजय मुंडे यांना पण धमकीचा फोन आल्यानं खळबळ उडाली आहे. मुंडे यांच्या परळी येथील निवासस्थानी हा धमकीचा फोन आल्याची माहिती मिळतेय.विशेष म्हणजे धमकी देणाऱ्या व्यक्तीनं त्यांच्याकडं ५० लाख रुपयांची मागणी केली आहे.

 

यापूर्वी एका अज्ञात व्यक्तीने भुजबळ यांच्या कार्यालयात फोन करून आपल्याला सुपारी मिळाल्याचा दावा केला होता. यासंदर्भातील ऑडिओ क्लिप देखील समोर आली होती. पुण्यात दौऱ्यावर असताना रात्री साडे अकराच्या सुमारास धमकीचा फोन आल्याचं सांगितलं जात आहे.

 

भुजबळांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी रायगडमधील महाड इथून अटक केली आहे. धमकी देणाऱ्याचं नाव प्रशांत पाटील असून तो कोल्हापूरच्या चंदगड येथील आहे. या तरुणानं मद्यधुंद अवस्थेत ही धमकी दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles