17.9 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

देशात मेडिकल प्रॅक्टिस करायचीय, NEXT परीक्षा द्यावी लागणार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

वैद्यकीय पीजी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट पीजीऐवजी आता नेक्स्ट (नॅशनल एक्झिट टेस्ट) परीक्षा होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी पुढील वर्षापासून ही परीक्षा होणार असल्याची घोषणा केली.नेक्स्ट परीक्षेतील गुणांच्या आधारे एमडी, एमएसकरिता प्रवेश दिला जाणार आहे.

विद्यार्थी हिताचा विचार करून वर्ष 2020 च्या बॅचपासून ही परीक्षा घेण्यात येणार आहे. एमबीबीएस अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. याशिवाय ते विद्यार्थी हिंदुस्थानात मेडिकल प्रॅक्टिस करू शकणार नाहीत. यासोबतच परदेशातून वैद्यकीय पदवी घेतलेल्या एमबीबीएसच्या उमेदवारांनाही देशात प्रॅक्टिससाठी ही परीक्षा देणे बंधनकारक असणार आहे.

 

नॅशनल मेडिकल कमिटीने (एनएमसी) आधी जाहीर केल्याप्रमाणे नेक्स्टची परीक्षा 2019 मध्ये प्रवेश घेतलेल्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांपासून घेण्यात येणार होती. मात्र मांडविया यांनी शुक्रवारी 2019 ऐवजी 2020 च्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांपासून परीक्षा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. म्हणजेच 2020 ची एमबीएस विद्यार्थ्यांची नेक्स्ट परीक्षा देणारी पहिली बॅच ठरणार आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) रायपूर येथील क्रिटिकल केअर युनिटची पायाभरणी केल्यानंतर तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मांडविया यांनी नेक्स्ट परीक्षेविषयी माहिती दिली.

 

– नॅशनल एक्झिट टेस्ट ही सामान्य पात्रता परीक्षा असेल.

– एमबीबीए, मेडिकल प्रॅक्टिससाठी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या गुणवत्तेवर आधारित प्रवेशासाठी ही परीक्षा आवश्यक असेल.

– इतर देशांमधून एमबीबीएस पदवी घेतलेल्या उमेदवारांनाही हिंदुस्थानात सराव करण्यासाठी ही परीक्षा द्यावी लागेल.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles