22.2 C
New York
Saturday, July 19, 2025

Buy now

spot_img

नीलम गोऱ्हेंचा ठाकरे गटाला अखरेचा जय महाराष्ट्र

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई |

महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीक घडामोडींना वेग आला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे उबाठा गटाला सोडून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

नीलम गोऱ्हे या ठाकरे परिवाराच्या अतिशय विश्वासू समजल्या जातात.

 

नीलम गोऱ्हे यांच्या जाण्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. नीलम गोऱ्हे या विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत. शिंदे यांच्या बंडानंतर विधानसभेचे ४० आमदार शिंदे गटात सहभागी झाले होते. पण विधानपरिषदेच्या आमदारांनी उध्दव ठाकरेंना आपला पाटिंबा कायम ठेवला होता.

 

पण काही दिवसांपुर्वीच मनीषा कायंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर आणखी विधानपरिषद सदस्य शिवसेनेत प्रवेश करतील अशा चर्चा सुरू होत्या. आता नीलम गोऱ्हे यांच्या शिवसेनेत होणाऱ्या संभाव्य प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे.

 

नीलम गोऱ्हे यांच्या शिवसेनेत जाण्याच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देतांना उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले की, नीलम गोऱ्हे कुठेही जाणार नाहीत. त्या उध्दव ठाकरे यांच्या सोबतच कायम राहतील. त्या शिवसेनेत प्रवेश करणार ही बातमी अफवा आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles