17.9 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

चार वर्षांनी पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन, केंद्रात मंत्रीपदाची संधी मिळणार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

नवी दिल्ली |

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर वारंवार संधी टाळलेल्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन होण्याची शक्यता आहे.  त्यांना केंद्रात संधी मिळणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.

पंकजा मुंडे यांची राज्य भाजपने आतापर्यंत कोंडी केली असली तरी आगामी लोकसभेच्या दृष्टीने भाजपला ते परवडणारे नसल्याने आता त्यांना कंद्रात संधी देण्याबाबत एकविचार झाल्याची माहिती आहे.

२०१४ साली दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर पंकजा मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात संघर्ष यात्रा काढली होती. या यात्रेचा भाजपच्या विजयाला मोठा हातभार लागला. मात्र, पंकजा मुंडे  यांचे पुढे जात असलेले नेतृत्व भाजपच्या राज्यातील नेत्यांना नकोसे होते.  त्यामुळेच पंकजा मुंडे यांच्याकडील महत्वाची खाती काढून घेणे, त्यांच्या खात्यात न ऐकणारे अधिकारी देणे, त्यांच्या राजकीय विरोधकांना मदत करणे असे अनेक प्रयत्न झाल्याचा पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचा आरोप आहे.

दरम्यान, २०१९ साली पंकजा मुंडे यांचा परळीतून पराभव झाला. या पराभवात भाजपमधील पंकजा मुंडे यांच्या विरोधकांनी हातभार लावल्याचाही समर्थकांचा आरोप कायम आहे. तसेच, यानंतर राज्यसभा, विधान परिषद आदी ठिकाणी पंकजा मुंडे यांना टाळले गेले. अगदी त्यांचे कार्यकर्ते राहीलेल्यांना संधी मिळाली पण पंकजा मुंडेंना डावलल्याने समर्थकांमधील संताप आजही कायम आहे.

पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी अनेकदा जाहीर सभांमधून बोलून दाखवली. राज्यातील भाजप नेत्यांचे नेतृत्व मान्य करण्याचे त्यांनी सपशेल टाळले. आपले नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहाच असल्याचेही त्यांनी निक्षुन सांगीतले. गेल्याच महिन्यात आपल्याबाबत काय ठरवले आहे, अशी विचारणा अमित शहा यांना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्याकडे मध्यप्रदेश भाजपचे सहप्रभारीपद असून या चार वर्षांत त्यांना राज्याच्या भाजप प्रक्रियेपासून हळुहळु दुर केले जात असल्याचे स्पष्ट आहे.

 

अगदी अलिकडे मराठवाड्यातील भाजपचे कार्यक्रम देखील पंकजा मुंडे यांच्या अनुपस्थीतच होत आहे. आता तर राज्यात नवीन राजकीय समिकरणात जिल्ह्यातीलच त्यांचे राजकीय विरोधक धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळाले आहे. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी एकत्रित निवडणुका लढविण्याची घोषणा झाल्यामुळे त्यांच्या परळी मतदार संघात संधी कोणाला हाच मोठा पेच निर्माण झाला आहे. जर, नेत्या पंकजा मुंडे यांच्याच जागेचा पेच असेल तर आपले काय, असा पेच त्यांच्या समर्थक नेत्यांमध्ये आहे. मात्र, आतापर्यंत टाळलेल्या पंकजा मुंडे यांची नाराजी भाजपला आगामी लोकसभेला परवडणारी नसल्याचा सुरही भाजपच्या एका गोटातून निघत आहे. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन करण्याबाबत गांभीर्याने विचार झाला असून त्यांना केंद्रात मंत्रीपद देण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले जाते. पंकजा मुंडे यांना केंद्रात संधी म्हणजे त्यांचे पुनर्वसन असाच याचा थेट अर्थ आहे. मात्र त्यांना केंद्रात मंत्रीपद देणे म्हणजे आगामी काळात परळीची जागा त्यांना नाही असाही दुसरा अर्थ काढला जात आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles