19 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

एसटी बसची भाविकांच्या पिकपला धडक, दोघांचा जागीच मृत्यूl; सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीडमध्ये आज दोन भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसने भाविकांच्या पिकअपला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने 2 प्राध्यापक जागीच ठार झाले आहेत.

बीड-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर रविवारी मध्यरात्री भाविकांच्या पिकपला एसटी बसने धडक दिली आहे. या अपघातामध्ये 2 महिला भाविक जागीच ठार झाल्या, तर 13 जण जखमी आहेत. मथुराबाई गवाले आणि गंगुबाई जाधव ( दोघीही रा. परभणी) अशी मृत भाविकांची नावं आहेत. या घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास हजारे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

दुसऱ्या घटनेत आज सकाळी बीडहून शिरूर कासार येथील कालिका विद्यालयाला जात असताना झालेल्या भीषण अपघातात, दोन प्राध्यपकांचा मृत्यू झाला आहे. दुचाकीवर चाललेल्या दोन प्राध्यापकांना चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दोघेही जागीच ठार झाले. ही घटना बीड-अहमदनगर महामार्गावरील सैनिकी विद्यालयासमोर घडली.

 

अंकुश साहेबराव गव्हाणे (वय 35 रा. बीड) आणि शहादेव डोंगर (रा. जाटनांदूर) अशी मयत प्राध्यापकांची नावं आहेत. ते बीडच्या शिरूर कासार शहरात असणाऱ्या कालिका देवी विद्यालय प्राध्यापक होते. हा अपघात एवढा भीषण होता की अपघातानंतर प्राध्यापकाच्या दुचाकीने पेट घेतला आणि दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

बीड अहमदनगर रस्त्यावर सुरू असणाऱ्या कामामुळेच हा अपघात झाला असून सदरील गुत्तेदारावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles