18.3 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला .

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला.पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ‘तसंही महाराष्ट्र भाजपला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्त्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला. ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल’, असं राज ठाकरे म्हणाले.

 

‘ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं’, अशी भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

 

‘बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार?’, असा सवाल राज ठाकरेंनी केला.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles