21.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री पदी, 9 राष्ट्रवादी आमदारांची मंत्रीपदी वर्णी; शरद पवार यांना धक्का

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला वर्षपूर्वी झाल्यानंतर महाराष्ट्र सरकार मध्ये पुन्हा राजकीय भूकंप झाला आहे. राजभवनावर आज अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची अजित पवार पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत. अजित पवारांसोबत एनसीपीच्या 8 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. छगन भुजबळ, आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, अनिल पाटील, धर्मरावबाबा अत्राम यांचा समावेश आहे. अजित पवारांना एनसीपीच्या 50 पैकी 40 पेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं जात आहे. राजभवनावर आज शिंदे, भाजपा आणि एनसीपीचे आमदार एकत्र खेळीमेळीने बोलताना दिसले आहेत.

मागील काही दिवसांपासून भाजपा यासाठी जुळवाजुळव करत असल्याचं चित्र पहायला मिळत होते. त्याची दबक्या आवाजात चर्चा होती. देवेंद्र फडणवीस यांनी याबबतचे अनेकदा संकेत दिले होते. आज अखेर ते प्रत्यक्षात उतरले आहे. एनसीपी मध्ये झालेल्या घडामोडींनंतर अजित पवारांच्या नाराजीच्या अनेकदा चर्चा रंगल्या होत्या. परंतू अजित पवार यांनी आपण एनसीपीला सोडचिठ्ठी देणार नसल्याचं म्हटलं होतं. पण आज अखेर त्यांनी शरद पवार यांना धक्का दिला आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles