10.3 C
New York
Thursday, October 23, 2025

Buy now

spot_img

विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी;  दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

 पंढरपूर |

आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. यामुळे मंदिर परिसरदेखील भाविकांची गर्दीने बुधवारी गजबजून गेलेला दिसून आला. पंढरपूर शहरात, नदीपात्र, दर्शनरांग, ६५ एकरात साधारण ५ ते ७ लाख व वाखरी तळावर सुमारे ७ ते ८ लाख असे १२ ते १५ लाख भाविक विठुरायाच्या नगरी दाखल झाले आहेत.

मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, स्टेशन रोड, प्रदक्षिणा मार्ग, पत्रशेड परिसर, आदी परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. त्याचबरोबर विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन, मुखदर्शन रांग पत्राशेडच्या मधील १० नंबरच्या दर्शन मंडपापर्यंत पोहोचली आहे. दर्शनासाठी १८ ते २० तास लागत आहेत. दर्शन रांगेतील भाविकांना समितीने विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

त्याचबरोबर भाविकांच्या वर्दळीमुळे मंदिर परिसरातील कुंकुबुक्का, तुळशीच्या माळा, फूलविक्रेते, वेगवेगळ्या धातूंच्या मूर्ती, फोटोफ्रेम, आदी प्रासादिक वस्तू याबरोबरच गर्दीत कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाकडून प्रत्येक चौकात, विविध रस्त्यावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles