13.9 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपदासाठी बीआरएसची ऑफर!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई |

महाराष्ट्रात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. पण या निवडणुकांची तयारी आत्तापासूनच सुरु झाली आहे. तेलंगाणात सत्तेत असलेली मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्ष आता महाराष्ट्रात पाय रोवू पाहत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षातील अनेक नेते बीआरएसमध्ये दाखल होत आहेत. पण बीआरएसनं एक मोठी खेळी खेळली आहे. या पक्षानं मुख्यमंत्रीपदाचा चेहराही तयार केला आहे.

पंकजा मुंडेंना ऑफर

बीआरएसनं मुख्यमंत्रीपदासाठी थेट भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना ऑफर दिली आहे. आपल्याला भाजपमध्ये अनेकदा डावलण्यात आल्याची भावना पंकजा मुंडे यांच्यामध्ये आहे. तशी जाहीर नाराजी त्यांनी गोपिनाथ गडावर आपल्या भाषणात व्यक्त केली होती. यासाठी आपण अमित शहांना भेटणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळं त्यांच्या या कथित नाराजीचाच फायदा बीआरएस करुन घेताना दिसतो आहे.

का दिली ऑफर?

पंकजा मुंडेंच्या ऑफरबाबत सांगताना बीआरएसचे समन्वयक बाळासाहेब सानप म्हणाले, “गोपिनाथ मुंडे यांनी संपूर्ण देशभरात भाजप रुजवण्याचं काम केलं. पण त्यांच्या मुलीवरच आज भाजपत अन्याय होत आहे. त्यामुळं पंकजा मुंडेंना बीआरएसमध्ये घेण्यासाठी आम्ही अध्यक्ष केसीआर यांच्याशी चर्चा करु. केसीआर त्यांना नक्कीच मुख्यंमत्रीपदाचा चेहरा बनवतील”

पंकजांनी अद्याप प्रतिक्रिया नाही

दरम्यान, पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपदासाठी ही मोठी ऑफर मिळाली असली तरी यावर अद्याप मुंडे यांच्याकडून कुठलंही उत्तर देण्यात आलेलं नाही. पण त्या या ऑफरकडे कशा प्रकारे पाहतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles