13.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

श्री.क्षेत्र अश्वत्थलिंग महादेव मंदिर ते श्री.क्षेत्र पंढरपूर पायी दिंडीचे प्रस्थान

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पाटोदा  |

पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथील श्री क्षेत्र अश्वत्थलिंग संस्थांनची आषाढी एकादशी वारी प्रित्यर्थ मठाधिपती महंत महादेवानंद भारती महाराज यांच्या मार्गदर्शनात श्री.क्षेत्र अश्वत्थलिंग महादेव मंदिर ते श्री.क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे प्रतीवर्षाप्रमाणे आयोजन केले असून आज दि.१८ जून २०२३ रविवार रोजी पायी दिंडीचे येथून प्रस्थान होणार असून पायी दिंडी सोहळ्यात पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.असे आवाहन श्री स्वामी महंत ह.भ.प.प.पू.गुरुवर्य महादेवानंद भारती महाराज यांनी केले आहे.रविवार दि.१८ जून २०२३ रोजी सकाळी ९:३० वा.श्री.क्षेत्र अश्वत्थलिंग महादेव मंदिर व श्री.स्वामी गंगा भारती महाराज मठ येथे पूजा,आरती होऊन प्रस्थान होणार आहे.पायी दिंडी पिंपळवंडी गावातून सरदवाडी, धोपटवाडी,वांजरा फाटा,सौताडा,जामखेड,धोंडपारगाव,जवळा, करमाळा,टेंभुर्णी मार्गे पंढरपूर येथे पोहोचणार आहे.पायी दिंडी सोहळ्याचे हे २ रे वर्ष असून पायी दिंडी सोहळ्यात भाविक-भक्त वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आषाढी वारीचा लाभ घेतात.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles