15.9 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

दोन हजारच्या नोटांचा असाही फायदा; अनेक दिवस रखडलेली उधारी देण्यासाठी होतोय वापर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने 19 मे पासून दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याचा आदेश जारी केला आहे. यामध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून किंवा जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या नोटबंदीचा फायदा हा धंदेवाल्यांना होत आहे. कारण अनेक दिवस गुंतलेली उधारी निघण्यास सुरवात झाली आहे. मागील नोटा बंदीचा अनुभव पाहता बॅंका, तसेच ग्राहक अनेक गोष्टी शिकल्या आहेत, त्यामुळे नोटा जमा करण्यासाठी एक आदर्श आचारसंहिता तयार केली आहे; परंतु याचा काहीसा उलट परिणाम पाहावयास मिळत आहे.

 

आरबीआयने नोटा बदलण्याचे आवाहन केले आहे न की नोटा बाद केल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांनी बॅंकाच्या नियमावलीत न पडता दुसरा व सोपा मार्ग अवलंबला आहे. सोन्याची उधारी, पेट्रोल पंप वाल्यांची उधारी, शेतीच्या औषधांची उधारी यांसारख्या अनेक उधाऱ्या चुकत्या होऊ लागल्या आहेत. यामध्ये गेल्या दहा वर्षांच्या उधाऱ्या या चुकत्या झाल्याची उदाहरणे आहेत. याचवेळी अनेक नागरिकांनी दोन हजार रुपयांच्या स्वरूपात असणारा पैसा हा सोने-चांदीसारख्या वस्तूंमध्ये गुंतवणूक करण्यास सुरवात केली आहे. त्या मुळे सोनाराच्या दुकानावर सध्या गर्दी पाहायला मिळत आहे.

 

महिला-भगिनींची बचत पुन्हा संपली

 

मागील नोट बंदीच्या काळात असेल किंवा दोन हजार रुपयांची नोट बदलण्याचा विषय असेल ग्रामीण भागात रोजंदारीवर काम करणाऱ्या किंवा चार-दोन शेळ्या-मेंढ्या पाळणाऱ्या महिलांची बचत पुन्हा एकदा संपली आहे. अनेक स्त्रिया या मोलमजुरी करून काही रक्कम पतीच्या परस्पर साठवून ठेवतात आणि अडचणीच्या काळात, मुलांच्या आजारपणात हे पैसे उपयोगी होतात.अशा महिलांचे बॅंकेत खाते नसते, त्यामुळे ठेवलेले पैसे हे दुसऱ्याकडे देऊन त्याच्या मेहेरबानीवर बदलून घ्यावे लागत आहे, त्यामुळे या नोट बंदीचा परिणाम ग्रामीण भागातील कष्टकरी स्त्रियांवर झाला आहे.

 

पेट्रोल पंपवाल्यांची अरेरावी

अनेक पेट्रोल पंपावर अडवणूक करून दोन हजार रुपयांची नोट असेल तर पूर्ण दोन हजार रुपयांचे पेट्रोल, डिझेल भरावे लागत आहे, त्यामुळे अनेक सामान्य नागरिकांना मनस्ताप सोसावा लागत आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles