13.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

प्रि-वेडिंग शूट; ग्रामीण भागातही श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत सर्वांना भुरळ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

लग्नाआधीचे फोटो म्हणजे प्रि-वेडिंग शूटिंगला सिनेतारकांनी केलेली सुरवात आता ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोहचली आहे. लग्नाआधी निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन काही क्षणांचे, फोटोग्राफरच्या दिग्दर्शनाने सुंदर चित्र रंगवले जाते, ते क्षण स्मरणात राहण्यासाठी ‘प्रि-वेडिंग शूट’ चा जन्म झाला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.यामध्ये श्रीमंतापासून गरिबांपर्यंत या प्रि-वेडिंगची भुरळ पडली आहे.

 

काळ बदलला, काळाच्या ओघात जुन्या प्रथा, परंपरा बदलल्या, अखेरची मंगलाष्टके होईपर्यंत वधू-वराची दृष्टादृष्ट न होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारा अंतरपाट या प्रि-वेडिंगच्या जमान्यात मात्र विरळ झाला आहे. सिनेमातील काही प्रेम-दृश्‍यांचे अनुकरण करून, तसेच दृश्‍य फोटोग्राफर यांच्याकडून साकार करून घेत असतो. नंतर त्याला संगीताची जोड देऊन ते चित्र बोलके केले जाते.

 

मग ते लग्नवेळी पण लग्नाआधी फोटो व व्हीडिओ स्क्रीनच्या माध्यमातून उपस्थितांना दाखविले जातात; परंतु अनेक जणांची परिस्थिती नसतानासुध्दा प्रि-वेडिंग करावे लागत आहे. कारण नाही केले तर ते मागासलेपणाचे ठरू शकते, अशी भीती त्यास वाटत आहे. फोटोग्राफरची ठरलेली रक्कम देताना तो मेटाकुटीला येत आहे.

 

‘प्रि-वेडिंग’नंतर लग्नाला नकार

प्रि-वेडिंगला जाऊन मुक्काम करून आल्यानंतर नवऱ्या मुलाने दुसऱ्या दिवशी – “मला मुलगी पसंत नाही’ म्हणून लग्नास नकार दिले आहेत. खरे तर या फालतू प्रदर्शनातून समाजाने बोध घेण्याची गरज आहे. हे कसले पुढारपण. आपण शूट केलेले काही वेगवेगळ्या पोजचे फोटो सार्वजनिक होऊन त्याचा चुकीचा संदेश तर जाणार नाही ना हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे.

 

काही संघटनांची या चालींवर बंदी

काळानुसार जुन्या प्रथा-परंपरांना काही फाटा देऊन लग्नकार्य होत आहेत. समाजानेही ते स्वीकारले आहे; परंतु समाजाच्या गळी काहीही उतरवणे योग्य ठरणार नाही. यातून आपल्या धर्माच्या, संस्कृतीच्या सीमा ओलांडल्या जात आहेत आणि त्यामुळे नको त्या घटना घडू लागल्या आहेत. पुणे जैन संघटनेने, सोलापूर मराठा वधू-वर संघानेही, पांचाळ सोनार समाजाने यावर बंदी घातली असून या सर्वांचे या निर्णयाचे सोशल मीडियावर जोरदार स्वागत झाले आहे. ही बाब लोकचळवळ झाली पाहिजे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles