19 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

लोकसभेबरोबर विधानसभा निवडणूक? मुख्य निवडणूक अधिकार्‍यांच्या आदेशानेे संकेत

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

नवी दिल्ली | 

महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागले आहेत. अशावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरु केली आहे.

2024 ला होणार्‍या या निवडणुकांच्या तयारीसाठी सर्व जिल्ह्यांतील निवडणूक शाखेतील अधिकारी व सेवकांना निवडणुकीसंदर्भातील कामांशिवाय इतर कामे देऊ नयेत, असे आदेश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले आहेत. त्यामुळे लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुकीचीही तयारी निवडणूक आयोगाकडून करण्यात येत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी त्याबाबत आदेश काढले आहेत. या आदेशानुसार त्या-त्या जिल्ह्यांतील निवडणूक शाखांतील सेवकांना निवडणुकीखेरीज दुसरी कोणतीच कामे देऊ नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार निवडणूक विभागातील सर्वच अधिकारी व सेवक आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने कामास लागले आहेत. निवडणुकीची कामे करताना निवडणूक शाखेतील सेवकांकडे इतर कोणतीही कामे दिली जात नाहीत.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या कामकाजाची जबाबदारी जिल्ह्यांत प्रामुख्याने तेथील उपजिल्हा निवडणूक अधिकारी आणि त्यांच्याअंतर्गत असलेल्या सेवकांवर असते. केंद्रीय निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पूर्वतयारीसाठी ठरलेल्या योजनेनुसार सर्व कामे वेळेत व्हावीत म्हणून निवडणूक शाखेतील अधिकारी व सेवकांवर जबाबदारी राहणार आहे. म्हणून निवडणूक शाखांतील सेवकांना निवडणुकीशिवाय दुसरी कोणतीही कामे देऊ नयेत, असे सूचित करण्यात आले आहे.

राज्यातील सध्याची अस्थिर राजकीय स्थितीचा विचार करता लोकसभेबरोबर विधानसभेच्याही निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे निवडणूक आयोगदेखील त्यादृष्टीने तयारी करीत असल्याचे सांगितले जात आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles