15.9 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

अंबाजोगाईत जुगार अड्डयावर छापा, बारा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त,२५ आरोपींवर गुन्हा दाखल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अंबाजोगाई  |

 

सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी स्वतः शहरातील गवळीपुरा भागात जुगार अड्ड्यावर दि.२३ मंगळवार रोजी रात्रीच्या सुमारास छापा मारून जवळपास२४ जुगाऱ्याना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १२ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी जुगार मालकासह पंचेवीस जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील गवळीपुरा भागात पाशा चौधरी,रहेमान सुलेमान हे राहत्या घरासमोरील पत्र्याच्या शेडच्या बंद खोलीत जन्ना मन्ना (अंदर बहार) नावाचा जुगार बेकायदेशीररित्या खेळत असल्याची माहिती मिळाली. याठिकाणी छापा मारला असता तिथे २४ जुगारी आढळून आले. जुगाराचे साहित्य,मोबाईल, दुचाकी असा १२ लाख १७ हजार ६०० रुपयाचा माल जप्त करण्यात आला असून जुगार मालकासह २५ आरोपीवर पो.हे.राजू वंजारे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपनिरीक्षक आनंद शिंदे,पोलीस अंमलदार मुकुंद ढाकणे, राजू वंजारे, बालाजी दराडे, दिलीप गित्ते, गोविंद मुंडे,चालक शिंगारे, पोलीस उपनिरीक्षक चांद मेंडके यांनी केली आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles