19 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

गोगावले, बच्चू कडू, पडळकर, शेलार, नितेश राणे मंत्री होणार?; मंत्रिपदासाठी कोणत्या 12 नावांची चर्चा?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

नव्या मंत्रिमंडळात 12 जणांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यात शिंदे गटाकडून भरत गोगावले, संजय शिरसाट, राजेंद्र पाटील यड्रावकर, आणि बच्चू कडू यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

भरत गोगावले यांचं प्रतोदपद गेल्याने त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. गोगावले यांचा मंत्रिमंडळात स्थान दिल्यास कोकणातील मंत्र्यांची संख्या तीन होणार आहे. उदय सामंत आणि दीपक केसरकर हे विद्यमान मंत्रिमंडळात मंत्री आहेत. शिंदे गटाकडून आणखी कुणाला संधी मिळणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

भाजपकडून शेलार, बोर्डीकर आणि निलेंगेकर

तर भाजपकडून आशिष शेलार, नितेश राणे, प्रवीण दरेकर, गोपिचंद पडळकर, मनिषा चौधरी, मदन येरावार, संजय कुटे, संभाजी निलेंगकर पाटील, मेघना बोर्डीकर आणि राणा जगजितसिंह यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. आशिष शेलार हे फडणवीस सरकारमध्ये मंत्री होते. पण त्यांना अल्पकाळ मिळाल्याने त्यांना पुन्हा संधी देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर प्रवीण दरेकर हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते, त्यामुळे त्यांनाही संधी दिली जात असल्याचं समजतं. विद्यमान सरकारमध्ये एकही महिला मंत्री नाही. त्यामुळे मनिषा चौधरी आणि मेघना बोर्डीकर यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, असं सांगितलं जात आहे.

मिशन महापालिका

यंदाच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. नव्या विस्तारात त्याचं प्रतिबिंब दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे. नव्या विस्तारात आशिष शेलार, नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि मनिषा चौधरी या चार नेत्यांना संधी देऊन मुंबई सर करण्याचं नियोजन भाजपने केल्याचं सांगितलं जात आहे. भाजपच्या या गेम प्लानला किती यश मिळतं हे येणाऱ्या काळातच दिसून येणार आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles