18.2 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

फेसबुकच्या माध्यमातून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लुबाडणाऱ्या हनी ट्रप टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

फेसबुकच्या माध्यमातून रिक्वेस्ट पाठवून पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना लुबाडणाऱ्या हनी ट्रप टोळीचा जामखेड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एकास अटक केली आहे.सोशल मीडियाच्या माध्यमांतून हनी ट्रप करणारी टोळी उजेडात आल्याने जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

जामखेड तालुक्यातील नान्नज-चोभेवाडी परिसरातील एका महिलेने फेसबुकवरून लातूर जिह्यातील अहमदपूर येथील एका ट्रक ड्रायव्हरशी मैत्री केली होती. दोघांमध्ये फेसबुकवर संवाद झाल्यानंतर महिलेने फोन नंबर देत ड्रायव्हर सोबत प्रेमाच्या गप्पा करत त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दरम्यान, गुरुवारी (दि. 11) त्या महिलेने त्याला भेटण्यासाठी नान्नज-चोभेवाडी गावात बोलावले होते.

ट्रक ड्रायव्हर नान्नज-चोभेवाडी परिसरात आल्यानंतर संबंधित महिला त्याला आपल्या घरी घेऊन गेली. तेथे गेल्यानंतर त्या ड्रायव्हरला महिलेल्या नातेवाईकांनी मारहाण करीत पैशांची मागणी केली. परंतु, त्याने पैसे न दिल्याने त्याला जबरदस्तीने कपडे काढायला लावून त्या महिलेसोबत अर्धनग्न अवस्थेत फोटो काढले. तसेच पैसे दिले नाही, तर बलात्काराची खोटी तक्रार नोंद करील, अशी धमकी दिली. त्यामुळे ड्रायव्हरने घाबरून काही पैसे आरोपींना दिले. परंतु, आरोपी महिला व तिचे नातेवाईक दिलेल्या पैशाने समाधानी नव्हते. त्यामुळे वरील आरोपींनी ड्रायव्हरला बांधून ठेवत त्याच्या मोबाईलवरून त्याच्या पत्नी व नातेवाईकांकडे पैसे मागण्यास सुरुवात केली.

दरम्यान, ड्रायव्हरच्या पत्नीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने ट्रक ड्रायव्हरच्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता, ट्रक ड्रायव्हर हा जामखेड तालुक्यातील चोभेवाडी येथे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी चोभेवाडी येथे धाड टाकून एकाला ताब्यात घेत ड्रायव्हरची सुटका केली. इतर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडे, उपनिरीक्षक अनिलराव भारती यांच्या पथकाने केली.

जामखेड तालुक्यात काही लोक सोन्याच्या ड्रॉप करण्यासाठी ओळखले जातात. आता यातील काही जण महिलांना पुढे करून सोन्याच्या ड्रॉपऐवजी हनी ट्रपमध्ये सक्रिय तर झाले नाहीत ना? असा संशय सदरच्या घटनेवरून निर्माण झाला आहे. सोन्याच्या ड्रॉपसाठी प्रसिद्ध असलेले आता हनी ट्रपमध्ये सक्रिय झाल्याने संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles